Kangana Ranaut कडून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

'या' व्हिडीओमध्ये कंगनाने ओलांडल्या सर्व मर्यादा... सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...   

Updated: May 5, 2022, 09:02 AM IST
Kangana Ranaut कडून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ   title=

मुंबई : वादाचा मुकूट कायम डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत लवकरचं 'धाकड' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. कंगनाने सर्वत्र सिनेमाच्या प्रमोशनची तयारी सुरू केली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर कंगनाने सिनेमातील पहिलं गाणं चाहत्यांसाठी प्रदर्शित केलं आहे. कंगनाने 'She's on Fire' गाण्याचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे.

गाण्याच्या टीझरमध्ये  कंगनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रत्येकाला गाण्याची प्रतीक्षा आहे. पाहा टीझर... 3

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'She's on Fire'  गाणं बादशाहच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. या गाण्यात कंगना रनौत व्यतिरिक्त अर्जुन रामपाल देखील दिसणार आहे. या गाण्यात कंगना राणौतचे अनेक अवतार तुम्हाला पाहायला मिळतील. 

आगामी सिनेमातील नव्या गाण्याचं टीझर शेअर करताना कंगनाने 'आग इतकी भीषण आहे की अग्निशमन दलही ती विझवू शकत नाही!' असं लिहिलं आहे. सध्या कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.