Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...

Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.

Updated: Feb 5, 2023, 07:04 PM IST
Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली... title=
Kangana Ranaut,Ranbir kapoor, Alia Bhatt

Kangana Ranaut On Nepokids: बॉलिवूडची ड्रामा क्विन आणि पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) अनेकदा तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. अभिनयापेक्षा जास्त तिची चर्चा तिच्या वक्तव्यामुळे होताना दिसते. बॉलिवूडवर (Bollywood) ताशेरे ओढणाऱ्या कंगनाने पुन्हा एकदा आगपाखड केल्याचं पहायला मिळतंय. कंगनाने नेपोकाइड्सवर (Kangana Ranaut On Nepokids) गंभीर आरोप केल्यानं ती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. (kangana ranaut accused napokids said they are being spied on her dig ranbir and alia in cryptic instagram post latest news)

कंगनाने इंस्टाग्रामवर (Kangana Ranaut Instagram) एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे आणि तिथे सर्व तपशील दिले आहेत. नेपोकाइड्स तिच्यावर नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे. कंगनाने हे आरोप थेट रणबीर (Ranbir kapoor) आणि आलियावर (Alia Bhatt) केल्याची चर्चा सध्या बॉलिवडूच्या कट्ट्यावर सुरू आहे. कंगनाच्या या आरोपामुळे नेपोकीड नेमके कोण आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

काय म्हणाली Kangana Ranaut ?

डेटा लीक होत असल्याचा संशय कंगनाला आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही बाजूंचे तपशील लीक होत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. मी तिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातोय. माझ्यावर हेरगिरी केली जात आहे. माझे फोटो लीक केले जात आहेत. माझं शेड्यूल यांना कसं कळतंय. यांना कोण पैसे देतंय का?, असे सवाल कंगनाने उपस्थित केले आहेत. 

kr

माझा व्हॉट्सअॅप डाटा, माझा पर्सनल डाटा, माझ्या अनेक प्रोफेशनल गोष्टी बाहेर जात आहेत. एका वेड्या माफियाला माझ्याबद्दल माहिती आहे. एक दिवस न बोलवता तो माझ्या दारात आला. मला बळजबरीने भेटण्याचा प्रयत्न केला. तो माफिया ब्रिगेडचा उपाध्यक्ष झालाय, असा आरोप देखील तिने यावेळी केलाय. माझ्यासारखं इंटेरिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप कंगनाने केला आहे.