कंगणानं केलं १ लाख रूपयांचं दान

पृथ्वी दिनाचे औचित्य साधत कंगणाने 'पाणी फाउंडेशनला' आर्थिक मदत केली आहे. 

Updated: Apr 23, 2019, 08:14 AM IST
कंगणानं केलं १ लाख रूपयांचं दान title=

मुंबई : नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कंगणा तिच्या वादग्रस्त विधानांन मुळे चर्चेत असते. पण पृथ्वी दिनाचे औचित्य साधत कंगणाने 'पाणी फाउंडेशनला' आर्थिक मदत केली आहे. अभिनेता अमिर खानच्या पाणी फांउडेशनला कंगणाने १ लाख रूपायांची मदत केली आहे. याविषयी माहिती कंगणाची बहिण रंगोलीने तिच्या ट्विटर आकाउंटच्या माध्यमातून दिली आहे. 

रंगोलीने तिच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहीले आहे की, 'कंगणाने १ लाख रूपये आणि मी १ हजार रूपये 'पाणी फांउडेशनला' दान म्हणून दिले आहे. प्रत्येकाने आपल्या जगाच्या पोशिंद्यास शक्य तितके दान करावे. मागील कित्येक दिवसांपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे.' तेव्हा पृथ्वी दिनाचे औचित्य साधत मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी पुढे करण्याचे आवाहन कंगणाच्या बहिणीने केले आहे. 

कंगणा लवकरच तिचा आगामी 'मेंटल हैं क्या' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात कंगणा अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'मेंटल हैं क्या' चित्रपटात हे दोघे मानसिक संतूलन ढसळलेल्या व्यक्तींची भूमिका साकारताना दिसणार आहेत.