हॉस्पिटलच्या बेडवर 'अल्लाह के बंदे' गाणं गात 'या' प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत गायक अल्लाह के बंदे हे गाणं गाताना दिसत आहे.

Updated: Nov 2, 2022, 11:49 PM IST
हॉस्पिटलच्या बेडवर 'अल्लाह के बंदे' गाणं गात 'या' प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास title=

मुंबई : प्रसिद्ध मणिपुरी गायक युमनामने दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेले बरेच दिवस तो गंभीर आजाराशी झुंज देत होता. सुरेन यमनामने उपचारादरम्यान कधीही धीर सोडला नाही. तो नेहमीच त्याच्या गाण्यातून प्रेक्षकांची मनं जिंकायचा. शेवटच्या टप्प्यातला असाच एक त्याचा व्हिडिओ त्याचा समोर आला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.  गायका यमनामला हॉस्पिटलच्या बेडवर मशिन्सने वेढलेलं असतानाही कैलाश खेरचं 'अल्लाह के बंदे' हे गाणे दमदार आवाजात गाताना दिसत आहे.

कैलाश खेरने सिंगर सुरेन युमनामचा व्हिडिओ केला शेअर
सुरेन युमनामच्या निधनानंतर कैलाश खेरने त्याचा गाणं गाताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कैलाश खेरने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'मणिपुरचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक सुरेन युमनाम बेडवर अल्लाह के बंदे हे गाणं गाताना दिसत आहे. काल मणिपूरमध्ये त्यांनी आजाराने अखेरचा श्वास घेतला आणि स्वर्गीय निवासात रवाना झाले. पण आम्हा सर्वांना हसतमुखाने जगण्याचा संदेश दिला...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कैलाश खेरने लिहीलं की, खूप दुख: झालं जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला की, तो आणखी एक दिवस जगण्यासाठी कसा उत्सुक आहे. मणिपूरच्या लोकांनी त्याच्या उपचारासाठी 58, 51, 270 रुपये जमा केले आणि त्याच्या उपचारात आपलं सर्वोत्तम दिलं हे मला कळलं तेव्हा आनंदाला पारावार राहिला नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. देव मणिपूरच्या लोकांना कल्याण करो.