'काहे दिया परदेस' घेणार प्रेक्षकांचा निरोप

शिव-गौरीची हटके प्रेमकहाणीवर आधारित काहे दिया परदेस ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Updated: Sep 11, 2017, 10:15 PM IST
'काहे दिया परदेस' घेणार प्रेक्षकांचा निरोप title=

मुंबई : शिव-गौरीची हटके प्रेमकहाणीवर आधारित काहे दिया परदेस ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

गेल्या दीड वर्षांपासून झी मराठीवर काहे दिया परदेस प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. ही मालिका सुरु झाल्यानंतर मराठमोळी गौरी आणि वाराणसीचा शिव यांच्या कहाणीने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली होती. सायली संजीव ही गौरीच्या भूमिकेत तर रिषी सक्सेना शिवच्या भूमिकेत होते. या मालिकेला झी मराठीचे अनेक पुरस्कारही मिळाले होते. 

या मालिकेच्या जागी संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या मालिकेचा विशेष दोन तासांचा भाग २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता या मालिकेचे प्रसारण सुरु होईल. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे.