मुंबई : चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमध्ये कादर खान यांचं नाव सामील आहे. कादर खान यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. कादर खान हे केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते तर ते खूप चांगले लेखकही होते, त्यामुळेच कादर खान यांनी 250 हून अधिक चित्रपटांचं लेखन केलं होतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला कादर खान यांच्या संघर्षाबद्दल सांगणार आहोत. कादर खान यांचा जन्म 1937 मध्ये काबुल, अफगाणिस्तान येथे झाला. कादर खान लहान असतानाच त्यांचं कुटुंब भारतात आलं.
मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कादर खान राहत होते.
भारतात आल्यानंतर कादर खान यांचं कुटुंब मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये राहू लागले. कादर खान यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं, कादर खान लहानपणी मशिदीबाहेर भीक मागायचे. कादर खान यांनी एकदा सांगितलं होतं की, त्यांचं बालपण खूपच गरिबीत गेलं होतं. त्यांना अनेक दिवस उपाशी झोपावं लागलं.
मात्र, एवढं करूनही कादर खान यांच्या आईने त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवलं. कादर खान यांनी मुंबईच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. पुढे कादर खान यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगही केलं.
अशा प्रकारे कादर खान यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, कादर खान यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. याच कारणामुळे ते रंगभूमीशी जोडले गेले आणि नाटकात काम करत राहिले. पेशाने लेक्चरर असलेल्या कादर खान यांना दिलीप कुमार यांनी अशाच एका नाटकाच्या वेळी पाहिलं आणि नंतर त्यांना चित्रपटात आणलं. कादर खान आजही त्यांच्या उत्कृष्ट कॉमेडीसाठी स्मरणात आहेत.
90 च्या दशकातील प्रत्येक मुल कादर खान यांचे बॉलीवूडचे चित्रपट बघून मोठे झाले आहेत. कारण त्या काळात त्यांना कॉमेडीचा बादशाहा म्हणून घरा-घरात ओळखलं जायचं. तर कादर खान यांनी नेहमीच नकारात्मक पात्रांनाही न्याय दिला आहे. अशाप्रकारे कादर खान यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये विविध छोट्या-मोठ्या भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कादर खान एक प्रसिद्ध अभिनेते असण्यासोबतच एक कॉमेडियन, स्क्रिप्ट आणि संवाद लेखक देखील आहेत.