ज्युली २ सिनेमाचे हे सिन प्रदर्शनाआधीच झाले लिक

या सिनेमातील काही सिन्स लक झाल्याने सिनेमासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Updated: Nov 23, 2017, 09:47 PM IST
 ज्युली २ सिनेमाचे हे सिन प्रदर्शनाआधीच झाले लिक title=

मुंबई : दक्षिणेतील अभिनेत्री राय लक्ष्मीची प्रमुख भूमिका असलेला ज्युली २ हा सिनेमा अनेक कारणांमूळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण आता प्रदर्शनाच्या वाटेवर असताना या सिनेमातील काही सिन्स लक झाल्याने सिनेमासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

घटनेबद्दल चिंता 

राय लक्ष्मी हिने ट्विट करुन या घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  'हे काय चाललंय? मला याचे आश्चर्य वाटत आहे.

सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच लीक झालेले व्हिडीओ पाहणे हे हास्यास्पद आहे. आमची टीम याविरोधात कडक पावले उचलत आहे.' 

 

तीन सिन लिक 

ज्युली २ या सिनेमातील एकूण ३ सिन लिक झाल्याचे वृत्त आहे. 

१) यातील एका सिनमध्ये राय लक्ष्मीचा एका पुरुषासोबत हॉट सीन करताना दिसत आहे. 

२)सिनेमातील एकादृश्यातला तिचा लीप किसही लीक झाल्याचे कळत आहे.

३) लिक झालेल्या तिसऱ्या क्लिपमध्ये राय लक्ष्मीचा क्लोज अप दिसत आहे. 

पब्लिसिटी स्टंट ?

प्रदर्शनापूर्वी सिनेमाची चर्चा झाल्यास तो चांगला कमावतो. यासाठी अभिनेते, अभिनेत्री वेगवेगळ्या कमेंट्स, स्टेटमेंट करत असतात.

लिक झालेले सिन त्यानंतर राय लक्ष्मीचे ट्विट हे देखील प्रमोशनचा एक भाग आहे का ? अशी चर्चा रंगली आहे.