तुम्हाला हे ठाऊकच नसेल; पाहा गोष्ट आतापर्यंतच्या सर्वात महागड्या आणि सर्वात वादग्रस्त लग्नाची

सूत्रांच्या माहितीनुसार ज्युनिअर एनटीआरला 2010 मध्येच लक्ष्मीशी लग्न करायचं होतं

Updated: Apr 1, 2022, 05:00 PM IST
तुम्हाला हे ठाऊकच नसेल; पाहा गोष्ट आतापर्यंतच्या सर्वात महागड्या आणि सर्वात वादग्रस्त लग्नाची title=

मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबातील लग्नसोहळे म्हटलं, की आपोआपच आपल्या मनातलं कुतूहल आणखी वाढतं. असंच कुतूहल पाहायला मिळालं होतं नंदमूरी तारक रामा राव उर्फ ज्युनियर एनटीआर (Jr NTR) या अभिनेत्याच्या लग्नाच्या वेळी. 

त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. पण, त्यानं या सर्व चर्चा सुरु असतानाच त्यानं 2011 मध्ये श्रीनिवास राव यांची मुलगी लक्ष्मी प्रनथीशी लग्न केलं. 

वैयक्तिक आयुष्याविषयी या अभिनेत्याला फार गोष्टी सर्वांसमोर आणण्यात फारसा रस नसतो. पण, तरीही त्याच्या लग्नाविषयीची एक अशी माहिती समोर आली, की पाहणारेही पाहतच राहिले. 

सूत्रांच्या माहितीनुसार ज्युनिअर एनटीआरला 2010 मध्येच लक्ष्मीशी लग्न करायचं होतं. पण, तेव्हा तिचं वय अवघं, 17 वर्षे इतकं होतं. ज्यामुळं त्याच्याविरोधात बालविवाह कायद्याअंतर्गत तक्रार करण्यात आली होती. 

सरतेशेवटी त्यानं एक वर्ष वाट पाहत पुढच्या वर्षी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. Jr NTR आणि लक्ष्मीच्या लग्नासाठी तब्बल 15 हजार पाहुण्यांची हजेरी होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jr NTR (@jrntr)

एका कार्यक्रमामध्ये तर त्यांना पाहण्यासाठीच 10 लाख लोकांनी गर्दी केली होती. ज्यासाठी स्थानिक शासनाला खास रेल्वे चालवाव्या लागल्या होत्य़ा. 

हे एक असं लग्न होतं, ज्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या लग्नासाठी लक्ष्मीची साडीच 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तर मांडवासाठी 18 कोटी रुपये मोजण्यात आले होते आणि सगळीकडे याचीच जोरदार चर्चा सुरु होती.