पुढच्या ट्रीपची तारीख ठरली... 'झिम्मा2' २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात

मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

Updated: Oct 19, 2023, 02:02 PM IST
पुढच्या ट्रीपची तारीख ठरली... 'झिम्मा2' २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात title=

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सुपरहिट चित्रपटाने मागील वर्षी प्रेक्षकांना विशेषतः महिलांना वेडं लावले होते. हा आनंद पुन्हा एकदा महिलांना अनुभवता येणार आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले होते. जास्त करुन महिला वर्गात हा सिनेमा पाहिला गेला होता. आता पुन्हा एकदा झिम्मा सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.  आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट करत निर्मात्यांनी असे म्हंटले आहे की, ''पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात''
 
कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे.

आणि महत्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काहीं नवीन सदस्य ही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. "झिम्मा2" पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहांत दाखल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

झिम्मा सिनेमाच्या पहिल्या भागात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  महिलांना हा चित्रपट आपल्या जीवनाशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधणारा वाटला. अनेकींनी हा चित्रपट पाहून संसारातून वेळ काढत आपल्या मैत्रिणींसोबत सहलींचा बेतही बनवला. ज्या स्त्रिया कधीच चित्रपटगृहात गेल्या नव्हत्या, त्या खास 'झिम्मा' बघायला गेल्या. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारा हा होता.