Jennifer Winget ने पहिल्यांदाच Tanuj Virwani सोबतच्या नात्यावर तोडलं मौन, म्हणाली- 'मला पर्वा नाही..'

अभिनेत्री जेनिफर विंगेट लोकप्रिय टीव्ही आहे

Updated: Jun 12, 2022, 10:29 PM IST
Jennifer Winget ने पहिल्यांदाच Tanuj Virwani सोबतच्या नात्यावर तोडलं मौन, म्हणाली- 'मला पर्वा नाही..' title=

मुंबई : अभिनेत्री जेनिफर विंगेट लोकप्रिय टीव्ही आहे. तिने काही वर्षांपूर्वी ओटीटीच्या जगातही पाऊल ठेवलं आहे. तिची कोड एम सीरीज खूप हिट झाली आणि लोकांना तिला आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला आवडलं. आता या सिरीजचा दुसरा सीझनही रिलीज झाला असून पुन्हा एकदा जेनिफर विंगेटचं नाव तिच्या सिरीजमधील सहकलाकार तनुज विरवानीसोबत जोडलं जात आहे.

जेनिफरसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच तोडलं मौन 
जेनिफर विंगेट आणि तनुज विरवानी यांच्या लिंकअपच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत आहेत पण अभिनेत्रीने यावरील मौन तोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री म्हणाली, मला या बातम्यांचा काहीच खरक पडत नाही. कारण तिचं कुटुंब, तिचं मित्र, तिच्या जवळच्या व्यक्तींना यातील संपूर्ण सत्य माहिती आहे. तिने कबूल केलं की, तो एक पब्लिक फिगर आहे आणि लोकांची त्याच्याबद्दल वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींची पर्वा नाही.

घटस्फोटानंतर केलं नाही दुसरं लग्न
जेनिफर विंगेटने अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी पहिलं लग्न केलं होतं. पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर करण सिंग ग्रोव्हर बिपाशा बसूसोबत सेटल झाला. पण जेनिफर विंगेटने अजून लग्न केलेलं नाही. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या जेनिफरची गणना सर्वात सुंदर टीव्ही अभिनेत्रींमध्ये केली जाते आणि आता कोड M2 मधील मेजर मोनिकाच्या भूमिकेसाठी तिची प्रशंसा केली जात आहे.