कंगना मांडणार जयललिता यांचा अभिनय ते राजकारणापर्यंत प्रवास

राजकीय वर्तुळात कमालीचा दबदबा असणाऱ्या जयललिता यांचा 'थलायवी'...

Updated: Mar 23, 2021, 12:08 PM IST
कंगना मांडणार जयललिता यांचा अभिनय ते राजकारणापर्यंत प्रवास title=

मुंबई : बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री kangna ranaut कंगना रानौत हिची महत्त्वाची भूमिका असणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. राजकीय वर्तुळात कमालीचा दबदबा असणाऱ्या जयललिता यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट म्हणजे thalaivi 'थलायवी'. य़ा चित्रपटासाठी कंगनाने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत घेतली. 

कंगनाने चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये, 'त्यांनी सिनेविश्वात पाऊल ठेवलं आणि त्या विश्वाला अपलं करून घ्या... त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि एक आयकॉन बनल्या... जाणून घ्या त्यांनी प्रेरीत करणारी  गोष्ट... अभिनय ते राजकारणापर्यंत प्रवास..' 'थलायवी' चित्रपट 23 एप्रिला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने यांची भुमिका साकारण्यासाठी फक्त अभिनयाकडेच नाही तर शरीरावर देखील खूप मेहनत घेतली आहे. या दरम्यान  तिने तब्बल 20 किलो वजन वाढवलं. तर तिच्या समोर अव्हान होतं ते म्हणजे पुन्हा पूर्ववत होणं. कंगनाने यासाठी खूपच मेहनत घेतली आहे. कंगना तिच्या या प्रवासामुळे तुफान चर्चेत आली आहे.

जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या जीवनप्रवासाची अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. जयललिता या एक राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणून सर्वांमध्येच वावरत होत्या. पण, त्यांच्या जीवनातील असेही काही पैलू होते जे अनेकांना ठाऊकही नव्हते. असेच पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.