'पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला...', 'ॲनिमल' च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत

Javed Akhtar on Animal Success :  जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या यशावर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 7, 2024, 10:47 AM IST
'पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला...', 'ॲनिमल' च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत title=
(Photo Credit : Social Media)

Javed Akhtar on Animal Success : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 2023 मध्ये ब्लॉकबस्टर कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं जगभरात 900 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. त्यात 'ॲनिमल' चा दुसरा भाग येणार असल्यानं सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी देखील दुसरीकडे त्याच्यावर अनेकांनी टीका केल्या आहेत. दरम्यान, आता जावेद अख्तर यांनी 'ॲनिमल' या चित्रपटावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की हा चित्रपट हिट होणं खूप भयानक आहे. 

जावेद अख्तर यांनी अजिंठा-वेरुळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्लमध्ये एक स्पीकर आमंत्रित केलं होतं. या दरम्यान, त्यांनी आजच्या अभिनेत्यांविषयी वक्तव्य केलं. जावेद अख्तर यांनी  'ॲनिमल' ला मिळालेल्या यशावर प्रश्न उपस्थित केला आहे. 'लोकसत्ता'नं दिलेल्या माहितीनुसार, 'एका अभिनेत्याची प्रतिमाही योग्य आणि अयोग्य याविषयी असलेल्या त्याच्या जागरुकतेवरून बनवण्यात आली पाहिजे. आजच्या लेखकांना विचार करण्याची गरज आहे, कारण त्यांना गैरसमज जास्त होतात. त्याचं कारण हे आहे की समाज भ्रमात आहे. काय योग्य आणि काय अयोग्य हे समाज ठरवत नाही, तर चित्रपटात त्याचा परिणाम दिसतोय. एक वेळ होती जेव्हा गरीब हे चांगले होते आणि श्रीमंत चुकीचे होते. पण आज, आपल्या डोक्यात एकच विचार आहे, कौन बनेगा करोडपती?', असं जावेद अख्तर म्हणाले.

रणबीर आणि तृप्ती डिमरीच्या सीनवर वक्तव्य

जावेद अख्तर यांनी तृप्ती डिमरीच्या सीनला वक्तव्य केलं. जावेद अख्तर म्हणाले, 'जर कोणता चित्रपट आहे, ज्यात एक पुरुष कोणत्या महिलेला त्याचं बूट चाटायला सांगत असेल किंवा कोणता पुरुष बोलतो की महिलेला कानशिलात लगावणं योग्य आहे. तर चित्रपट सुपरहिट आहे, तर हे धोकादायक आहे.'

हेही वाचा : वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या सुपरस्टारशी केलं लग्न! प्रेम असं की चाहत्यांमध्ये आहे क्रेझ

जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'मला वाटतं की आजकाल चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत प्रेक्षकांवर जास्त जबाबदारी आहे. प्रेक्षकांना हे ठरवायची गरज आहे की त्यांना कोणते चित्रपट आवडतात आणि कोणते नाही. हे सगळं प्रेक्षकांवर अवलंबून आहे की ते कसे रिजेक्ट करतात. त्यामुळे सध्या सगळं काही प्रेक्षकांवर आहे. आजही अनेक चित्रपट निर्माते हे चांगले चित्रपट बनवतात, पण काही थोडेच. तुम्ही त्यांच्यासोबत किती वेळ उभे राहतात त्यावर चित्रपटाचं भविष्य अवलंबून असतं.'