मुंबई : चित्रपटात अपघाताचे थरारक सीन शुट करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात देखील अपघाताच्या घटना घडत असतात.या घटनेतही असचं झालंय. एका अभिनेत्याच्या कारला अपघात झाल्याची घटना घडलीय.या घटनेत अभिनेता थोडक्यात बचावला आहे.
गेम ऑफ थ्रोन आणि एक्वामॅन अभिनेता जेसन मोमोआच्या कारला अपघात झाल्याची घटना घडलीय. कॅलिफोर्नियामध्ये ओल्डस्मोबाईल कार चालवत असताना हा अपघात घडला.या अपघातात त्याला एका बाईकने धडक दिली. या अपघातात जेसन मोमोआ सुखरूप बचावला आहे तर बाईकस्वाराला दुखापत झालीय. बाईकस्वाराच्या पायाला आणि अंगठ्याला किरकोळ जखम झाली आहे. त्यामुळे बाईकस्वाराला रुग्णालयात नेण्यात आले.
बाईकस्वार जेसन मोमोआच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. तो ओल्डस्मोबाईलला धडकला आणि नंतर खाली पडला. वृत्तानुसार, त्याने मोमोआची विंडशील्ड उचलली आणि कारचा हुडही तोडला.
जेसन मोमोआ सध्या त्याच्या आगामी फास्ट एक्स चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये मिशेल रॉड्रिग्ज, रीटा मोरेनो, ब्री लार्सन, विन डिझेल, जेसन स्टॅथम, डॅनिएला मेलचियर, जॉन सीना, चार्लीझ थेरॉन, सुंग कांग, जॉर्डाना ब्रूस्टर आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. लुईस लेटरियर फास्ट अँड फ्युरियस फ्रँचायझीच्या दहाव्या भागाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 19 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.