Shocking! जास्मिन भसीनच्या शरिराचे अवयव झाले वेगवेगळे, Video Viral

बिग बॉस 14 ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन प्रेक्षकांना खूप आवडते. 

Updated: Oct 13, 2021, 06:23 PM IST
Shocking! जास्मिन भसीनच्या शरिराचे अवयव झाले वेगवेगळे, Video Viral title=

मुंबई : बिग बॉस 14 ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन प्रेक्षकांना खूप आवडते. जस्मिन भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. दरम्यान, जस्मिन भसीनने तिचा एक अतिशय विचित्र व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जस्मिनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. हे कसं घडलं हे चाहते समजू शकत नाहीत.

जस्मिनचे दोन भाग झाल्याचं दिसत आहेत!
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, जस्मिन भसीनचे शरीर आणि पाय दोन्ही स्वतंत्रपणे दिसत आहेत. असं म्हणू शकतो की, तिचं शरीर दोन भागांमध्ये विभागलेलं दिसत आहे. मात्र यानंतर ती नाचताना दिसतेय. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून तिचा बॉयफ्रेंड अली गोनी देखील चाहत्यांप्रमाणे आश्चर्यचकित झाला आहे. जास्मिनने असा व्हिडिओ का बनवला हे लोकांना अजूनपर्यंत समजत नाहीये. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जस्मिनने केलं विचित्र कृत्य
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, जस्मिन भसीन सोफ्यावर बसली आहे. तिचं शरीर पोटाच्या खाली दोन भागांमध्ये कापले गेलं आहे. जस्मिन भसीन आधी पुस्तक वाचते. मग ती बसून नाचते. मग तिचं अर्ध शरीर जागं होतं आणि मग ती व्हिडिओमधून अदृश्य होते. फक्त तिचे पाय दिसतात. हा व्हिडिओ फनीपेक्षा जास्त विअर्ड आहे. हा व्हिडिओ शेअर करताना जास्मिनने लिहिलंय की, 'हे देखील घडतं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जस्मिन भसीनचा हा व्हिडिओ पाहून तिचा बॉयफ्रेंड अली गोनी गोंधळून गेला आहे. अली गोनीने जास्मिनच्या पोस्टवर लिहिलंय की, 'तू काय करत आहेस? मला वाटतं की, मला परत यावं लागेल. अली गोनी व्यतिरिक्त, हिमांशी खुराना आणि मनु पंजाबी यांनी स्माईल ईमोजी शेअर करत प्रतिक्रीया दिल्या आहेत. सोशल मीडिया युजर्सही विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, 'तुम्ही वेगळे कशा झालात, तुम्ही हे कसं केलं?' अशा अनेक प्रतिक्रीया चाहत्यांच्या या पोस्टवर येत आहेत.