Ex- Boyfriend सोबत जान्हवीचं पॅचअप? अनंत अंबानीच्या साखरपुडा मात्र चर्चा याच कपल

Janhvi Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सगळ्यांचे लक्ष जान्हवी आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे लागले आहे.

Updated: Dec 31, 2022, 04:12 PM IST
Ex- Boyfriend सोबत जान्हवीचं पॅचअप? अनंत अंबानीच्या साखरपुडा मात्र चर्चा याच कपल title=

Janhvi Kapoor With Ex- Boyfriend Shikhar Pahadia at Anant Ambani Party : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी जान्हवीसोबत असलेल्या व्यक्तीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

जान्हवीचे हे फोटो  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant)यांच्या साखरपुड्यातील आहे. त्यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सेलिब्रिटींच्या यादीत किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan), बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे कलाकार देखील होते. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे जान्हवी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं (Shikhar Pahadia) वेधले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिच्या गाडीतून उतरून अंबानी यांच्या गेटजवळ जाताना दिसते. यावेळी तिच्यासोबत तिचा मॅनेजर असतो. तर त्या गेटजवळच जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडिया तिच्यासाठी थांबल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी जान्हवीनं गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) शिखर पहाडियाच्या (Shikhar Pahariya) आधी ईशान खट्टर, अक्षत राजन आणि ओरहान अवतारानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र जान्हवीने कधीच तिच्या कोणत्याही रिलेशनशिपविषयी कधीही उघडपेण सांगितले नाही.सध्या ती शिखर पहाडियासोबत अफेअरमध्ये असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : बाप-लेकीची भूमिका साकारणारे Nana Patekar, Manisha Koirala एकेकाळी रिलेशनशिपमध्ये, 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप

जान्हवीनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तिची आई श्रीदेवीनं (Sridevi) तिच्या बाथरुमचे लॉक काढले होते आणि आता घराचे रेनोव्हेशन केले तरी सुद्धा जान्हवीच्या बाथरुममध्ये लॉक नाही. वोगनं इंडियानं त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जान्हवीचे चेन्नईतील घर दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीचे घर आतून कसे दिसते ते पाहायला मिळत आहे. व्हिडीओत घरातल्या प्रत्येक गोष्टीविषयी जान्हवी सांगते. 'हे घर तिची आई श्रीदेवीने विकत घेतलं होतं, तिच्या आईनं घेतलेली पहिली प्रॉपर्टी म्हणजे हे घर आहे.' व्हिडिओमध्ये जान्हवी श्रीदेवी यांनी काढलेले पेंटिंग देखील दाखवते.

पुढे जान्हवी म्हणाली, 'माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही, कारण आई मला कधीच बाथरुमचं दार बंद करुन द्यायची नाही. मी बाथरुममध्ये जाऊन मुलांसोबत बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही.