'या' मिस्ट्री बॉयसोबत जान्हवी कपूर निघाली वेकेशनला;व्हिडिओ व्हायरल

मिस्ट्री बॉयसोबत व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे जान्हवी कपूर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एअरपोर्टवरील या व्हिडिओवरुन हे दोघ वेकेशनल जात असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Feb 28, 2023, 08:06 PM IST
'या' मिस्ट्री बॉयसोबत जान्हवी कपूर निघाली वेकेशनला;व्हिडिओ व्हायरल title=

Janhvi Kapoor Shikhar Pahariya Video : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी जान्हवीसोबत असलेल्या व्यक्तीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी शिखर पहाडीयासोबत दिसत आहे. त्यांच्यासोबत यावेळी बोनी कपूर सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ मुंबई एअरपोर्टवरचा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 
 
जान्हवी सिंपल लूकमध्ये दिसली
जान्हवी कपूरबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी अभिनेत्री अगदी साध्या लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीने साधा स्काय ब्लू कलरचा कुरता आणि पायजामा घातला आहे. यासोबतच तिने न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडत तिचा हा सिंपल लूक पुर्ण केला आहे.  

या व्हिडिओमध्ये शिखर पहाडियाने राखाडी रंगाचा पायजामा परिधान केलेला दिसत आहे. यासोबत निळ्या रंगाचा पुलओव्हर टीशर्ट त्याने घातला आहे.  त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये  बोनी कपूरही दिसत आहेत.  

या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत दिसली. जान्हवी आणि शिखर व्हिडिओमध्ये एकमेकांशी बोलताना दिसत नव्हते. पण हे तिघं एकत्र दिसले. हे सर्वजण एकत्र मुंबईबाहेर गेले असल्याचा अंदाज या व्हिडिओवरून वर्तवण्यात येत आहे.  जान्हवी कपूर अनेकदा शिखर पहाडियासोबत स्पॉट होते. दोघंही कधी एकमेकांसोबत करण जोहरच्या घरी पोहोचले आहेत तर कधी शिखर जान्हवीसोबत फॅमिली पार्टीतही स्पॉट होतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहेत. त्याने आधी जान्हवी कपूरला डेट केलं आणि नंतर ते वेगळे झाले. कॉफी विथ करण 7 वर, करण जोहरने अभिनेत्रीच्या डेटिंगच्या अफवांची पुष्टी केली, "मला म्हणायचं आहे की, हा तुमचा पास्ट होता. तुम्ही दोघी दोन भावांना डेट करत होता. आणि आम्हा तिघांमध्ये सामाईक गोष्ट म्हणजे ते दोघे माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होते.