कमालच! जान्हवी कपूरच्या नव्या घराची किंमत पाहून म्हणाल त्यामागे किती शून्य?

जान्हवीचं नवं घर प्रचंड महाग... अभिनेत्रीने ज्या किंमतीत एक Duplex घेतलं, त्यामध्ये जवळपास 6 ते 7 फ्लॉट आलेच असते...  

Updated: Nov 4, 2022, 10:40 AM IST
कमालच! जान्हवी कपूरच्या नव्या घराची किंमत पाहून म्हणाल त्यामागे किती शून्य? title=

Janhvi Kapoor New  : अभिनेत्री जान्हवी कपूरने (janhvi kapoor) 'धडक' सिनेमातून बॉविवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर जान्हवीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज जान्हवीचा 'मिली' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा 'मिली' सिनेमा प्रेक्षकांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जान्हवीचा नवा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे चाहते आनंदी आहेत, पण अभिनेत्रीबाबत आणखी एक मोठी गोष्टसमोर येत आहे. जान्हवीने नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीच्या घराची किंमत पाहून म्हणाल त्यामागे किती शून्य लागतील? (janhvi kapoor mother)

जान्हवीच्या नव्या घराची किंमत
जान्हवीने वयाच्या 25  (janhvi kapoor age) व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. जान्हवीने 10 - 20 कोटी रुपयांचं नाही तर तब्बल 65 कोटी रुपयांचं Duplex घर खरेदी केलं आहे.  रिअल-इस्टेट पोर्टल Indextap.com जान्हवीच्या नव्या घराबद्दल माहिती दिली आहे. (janhvi kapoor net worth) 

जान्हवीचं आणखी एक स्वप्न पूर्ण 
मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या नवीन घराचं क्षेत्रफळ 8 हजार 669 स्क्वेअर फूट आहे. ज्याचं कार्पेट क्षेत्र 6421 चौरस फूट आहे. नव्या प्रॉपर्टीची नोंदणी अभिनेत्रीने 12 ऑक्टॉबर रोजी केली. त्यासाठी अभिनेत्रीने 3.93 कोटी रुपये मोजले. (janhvi kapoor instagram) जान्हवी कपूरने ज्या किंमतीत Duplex घर खरेदी केलं आहे, त्या किंमतीत जवळपास 6 ते 7 फ्लॉट नक्कीच आलेच असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीचं जुनं घर
दरम्यान, जान्हवीने जून महिन्यात जुनं घर विकण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीचं जुनं घर अभिनेता राजकुमार रावने विकत घेतलं. राजकुमार रावने एक शानदार ट्रिपलेक्स अपार्टमेंट घेतलं आहे. तब्बल 44 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट त्याने विकत घेतलं आहे.  हे अपार्टमेंट मुंबईच्या जुहूमध्ये आहे.