'इन आँखो की मस्ती के...' रेखा यांच्या अदांना टक्कर देतेय 'कातिलाना' जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या या नवीन लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Updated: May 2, 2022, 12:23 PM IST
'इन आँखो की मस्ती के...' रेखा यांच्या अदांना टक्कर देतेय 'कातिलाना' जान्हवी कपूर title=

मुंबईः जान्हवी कपूर एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी जान्हवी अनेकदा तिचे नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते... पण आता तिच्या नव्या डान्स व्हिडिओमध्ये जान्हवीचे मनमोहक भाव पाहून चाहत्यांना कौतुक करायला भाग पाडलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रेखाच्या 'इन आँखों की मस्ती के...' या आयकॉनिक गाण्यावर नाचताना दिसत आहे. जान्हवी जमिनीवर एकाच जागी बसून अप्रतिम डान्स करत अप्रतिम एक्सप्रेशन देत आहे. 

नृत्यादरम्यान जान्हवीने अनारकली सूट घातला असून ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिने केसांमध्ये साधी पोनीटेल बनवली आहे. जान्हवीच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

कमेंट्समध्ये अनेक चाहत्यांनी जान्हवीची तुलना रेखा आणि माधुरी दीक्षितसोबत केली आहे. अनेकांना हा डान्स पाहून श्रीदेवी आठवण आली आहे. काही जणांकडून जान्हवीला डान्सिंग क्वीन म्हटलं जात आहे तर काही जणांकडून डान्सिंग दिवा.

जागतिक नृत्य दिवसनिमित्त 2 दिवस उशिरा हा व्हिडीओ शेअर करत आहे असं सुद्धा जान्हवीने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.