Viral VIDEO : चाहत्याने फोटो काढताना केलं 'असं' कृत्य, Janhvi Kapoor झाली Uncomfortable

Janhvi Kapoor : श्रीदेवी यांची कन्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिचासोबत एका चाहत्याने फोटो काढताना असं काही केलं की, त्यानंतर ती अस्वस्थ झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

Updated: Jan 10, 2023, 04:18 PM IST
Viral VIDEO : चाहत्याने फोटो काढताना केलं 'असं' कृत्य, Janhvi Kapoor झाली Uncomfortable title=
Janhvi Kapoor became Uncomfortable because Fan did such act while taking photo video viral on Social media marathi news

Janhvi Kapoor Viral Video :  बॉलिवूड (Bollywood news) अभिनेत्री जान्हवी कूपरने (Janhvi Kapoor) आता आपली सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या धाटनीचे चित्रपट करुन तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची कन्या असल्यामुळे तिच्यावर एक वेगळेच प्रेशर होतं. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे जान्हवीचा मोठा चाहतावर्ग आहे. जान्हवी सोशल मीडियावरही (Social media Video) सक्रीय असते. याशिवाय तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यात ती अस्वस्थ दिसतं आहे. 

अन् चाहत्याच्या 'त्या' कृत्याने

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जिममधून बाहेर पडते. तेव्हा एक चाहत्या तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतो. पापाराझीही (Paparazzi) तिला घेरतात आणि तिचा व्हिडीओ (Janhvi Kapoor Video) काढण्यास सुरुवात करतात. त्यावेळी चाहत्या जान्हवीच्या अगदी जवळ जाऊन फोटो क्लिक करतो. तो ज्या पद्धतीने फोटो काढण्यासाठी तिच्या जवळ सरकत असतो जान्हवी अस्वस्थ होते आणि ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण बाजूला भिंत होती त्या भिंतीवर एक कुंड्या ठेवल्या होत्या. ती जेव्हा चाहत्यापासून अंतर ठेवायचा प्रयत्न करते तेव्हा तिचा तोल जातो आणि ती कुंडीला धरते. (Janhvi Kapoor became Uncomfortable because Fan did  such act while taking photo video viral on Social media marathi news)

व्हिडीओ व्हायरल 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स घातलेली दिसतं आहे. या ड्रेसमध्ये जान्हवीचा बोल्ड (Bold look) अंदाज दिसून येतं आहे. जान्हवीचा जिम लूक (gym look) काय चर्चेत असतो. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिच्या कपड्यांवरून टीका केली आहे. छोटे कपडे घातल्यामुळे यूजर्सने आक्षेप घेतला आहे. 

आगामी चित्रपट 

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल (Entertainment News) बोलायचं झालं तर, सध्या ती तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटरच्या भूमिकेत असून या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार रावही दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री नितेश दिग्दर्शित बावल या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे.