सारा अली खानच्या भावासोबत जान्हवी कपूर रात्री उशिरा दिसली 'या' अवस्थेत

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सर्वाधिक चर्चेत असलेली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Updated: Sep 18, 2022, 03:25 PM IST
सारा अली खानच्या भावासोबत जान्हवी कपूर रात्री उशिरा दिसली 'या' अवस्थेत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सर्वाधिक चर्चेत असलेली लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर अनेकदा जान्हवीचे नव-नवीन फोटो समोर येतात ज्यांना खूप पसंत केलं जातं. आता जान्हवीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

इब्राहिम अली खानची पार्टी
जान्हवीने अलीकडेच तिची धाकटी बहीण खुशी कपूर, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणीसोबत पार्टीला हजेरी लावली होती. ओरहानने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रत्येकजण मस्ती करताना दिसत आहे. त्याच्या या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे, ज्यांना चाहत्यांनी पसंती दिली आहे.

जान्हवी- खुशी या स्टाईलमध्ये दिसली 
या पार्टीत जान्हवीने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला असून त्यासोबत तिने पांढरे शूज घातले होते. दुसरीकडे, खुशीने ब्राउन शॉर्ट लेदर स्कर्ट आणि ब्लॅक कलर ऑफ शोल्डर टॉप घातला होता यालाच मॅच तिने ब्लॅक हील्सही घातलेले दिसले. ओरहानने यावेळी ब्लू डेनिम शर्ट आणि ऑफ ब्लू डेनिम रिप्ड जीन्स घातली होती. इब्राहिम या पार्टीत निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स घालून पोहोचला होता.  

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी कपूर मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. याशिवाय ती मिली, बवल आणि दोस्ताना २ या चित्रपटातही दिसणार आहे. दुसरीकडे, खुशी कपूर देखील तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्याच्याशिवाय शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटात दिसणार आहे.