'रेस 3' च्या सेटवर जॅंकलीन फर्नांंडिस जखमी, रुग्णालयात दाखल

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा 'रेस 3' मधील लूक काही दिवसांपूर्वी सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. सध्या काही अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी सलमान खान सह 'रेस 3' ची सारी टीम अबुधाबीमध्ये आहे. मात्र या चित्रपटाच्या सेट्सवरून जॅंकलीनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.  

Updated: Mar 23, 2018, 10:14 PM IST
'रेस 3' च्या सेटवर जॅंकलीन फर्नांंडिस जखमी, रुग्णालयात दाखल  title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा 'रेस 3' मधील लूक काही दिवसांपूर्वी सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. सध्या काही अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी सलमान खान सह 'रेस 3' ची सारी टीम अबुधाबीमध्ये आहे. मात्र या चित्रपटाच्या सेट्सवरून जॅंकलीनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.  

जॅंकलीनला दुखापत  

जॅंकलीन फर्नांडीस 'रेस 3' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्क्वॉश खेळताना पडली. यावेळेस तिच्या डोळ्याला दुखापत झाली. तात्काळ उपचारासाठी जॅंकलीनला नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. जॅंकलीनच्या डोळ्यातून रक्तप्रवाह होत असल्याची माहिती बॉलिवूड लाईफने दिली आहे.  

दबंग टूर पुण्यात 

24 मार्चला पुण्यामध्ये सलमान खानची दबंग टूर आहे. या टूरमध्ये जॅंकलीनचाही समावेश होता. मात्र आता जॅंकलीन या टूरचा सहभाग होणार का ? याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. 

बागी 2 मध्ये एक,दो, तीन...  

बागी 2 या चित्रपटामध्ये एक, दो, तीन या 'तेजाब' मधील गाण्याला रिक्रिएट करण्यात आलं आहे. या गाण्यावर जॅकलीन फर्नांडीस थिरकली आहे. मात्र माधुरी दीक्षितसोबत जॅंकलीनची तुलना झाली. परिणामी तिला ट्रोल करण्यात आलं आहे.