मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ ग्लॅमरस तर आहेतच , पण सोबतच त्यांच्याकडे एक विशेष टॅलेंट आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक आहे. पत्नीच्या या टॅलेंटचा खुलासा खुद्द जॅकी श्रॉफ यांनी 'डान्स दीवाने सीजन' 3 च्या सेटवर केला होता. विकेंड एपिसोडमध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून हजेरी लावली होती.
यावेळी जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा शेअर केला. तो किस्सा ऐकल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ अॅक्शन वुमेन आहेत अशीच चर्चा सुरु झाली. त्याचं झालं असं की, या मंचावर जॅकी श्रॉफ यांना होस्ट राघवने प्रश्न विचारला की, तुम्ही तुमच्या पत्नीला घाबरता का?
यावर जॅकी श्रॉफ आणि सुनिल शेट्टी दोघांनी नम्रपणे हातात असलेला येस आयकॉन वर उचलेला. त्यानंतर याचं कारण सांगताना जॅकी श्रॉफ यांनी पत्नी आयशाचं हे टॅलेंट सगळ्यासमोर रिवील केलं.
जैकी श्रॉफ म्हणाले," मी फक्त नावाचा भिडू आहे. मी पहिल्यापासूनच घाबरत जगत आलो, ही आजचीच गोष्ट नाही. मी माझ्या पत्नीला फाईटींग करताना पाहिलं आहे. माझ्यामागे एकदा गुंडांची टोळी लागली होती. खूप मोठी गँग मला आणि माझ्या मित्राला मारायला आली होती. तेव्हा या गुंडांची धुलाई करत आयशाने माझा जीव वाचवला होता.
आयशा श्रॉफ 13 वर्षाच्या असताना त्यांची जॅकी श्रॉफ यांच्यासोबत भेट झाली. तेव्हाच त्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं.सुरुवातीला दोघे चांगले मित्र होते. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.आणि 1987 मध्ये त्यांनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली.