Mahesh Kothare: 'धडाकेबाज'मधील 'कवट्या महाकाळ'चा खरा चेहरा समोर

एका मुलाखतीत धडाकेबाज चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी कवट्या महाकाळची भुमिका कोणी केली याबद्दल सांगितले आहे. 

Updated: Feb 8, 2023, 03:19 PM IST
Mahesh Kothare: 'धडाकेबाज'मधील 'कवट्या महाकाळ'चा खरा चेहरा समोर title=

Mahesh Kothare: मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे आजही आपल्या मनावर अधिराज्य करतात. त्यातील असे अनेक सिनेमे हे मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare Films) यांनीही आपल्यासाठी आणले. त्यातील त्यांचा सर्वात हीट ठरलेला चित्रपट म्हणजे धडाकेबाज! (Dhadakebaaj) या चित्रपटातील कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढीच कमी. धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांची गंगारामची भुमिका विशेष गाजली होती. परंतु या चित्रपटातील विलन म्हणजे कवट्या महाकाळची भुमिका नक्की केली तरी कोणी, त्याचा चेहरा शेवटपर्यंत काही दिसला नाही. त्यामुळे एवढी लोकप्रिय खलनायकाची भुमिका करणारी व्यक्ती होती तरी कोण आणि आज ती काय करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. (Famous Marathi Director Mahesh Kothare reveals about man who played the role of kavtya mahakal in the film dhoom dhadaka)

एका मुलाखतीत धडाकेबाज चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी कवट्या महाकाळची भुमिका कोणी केली याबद्दल सांगितले आहे. त्या चेहऱ्यामागे नक्की कोणती व्यक्ती होती याबद्दल खुद्द महेश कोठारे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, कवट्या महाकाळ ही व्यक्तिरेखा करणारे हे महेश कोठारे यांचे मित्र होते. महेश कोठारे यांचे डॅम इट (Damn It) हे आत्मचरित्र प्रकाशित झाले तेव्हा त्यांनी झालेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. 

कोण होता कवट्या महाकाळ? 

महेश कोठारे यांनी सांगितलेल्या मुलाखतीतून त्यांनी सांगितले की, तो माझा एक जवळचा मित्र होता. तो आता हयात नाही. तो गुजराती अभिनेता होता. त्याचे नाव होते चंद्रकांत पांड्या. मी अनेक गुजराती चित्रपट केले. त्याचवेळी आमच्या दोघांची ओळख झाली. दुर्देवानं त्याच्याकडे कोणतेच काम नव्हते. तो एके दिवशी मला अचानक भेटला आणि म्हणाला चल चहा घेऊयात. बोलता बोलता तो मला म्हणाला की महेश काही काम असेल तर दे. 

मी त्याला म्हटले की एक काम आहे पण संपुर्ण चित्रपटात मास्क घालावा लागेल, त्यात तुझा चेहरा दिसणार नाही. हे एवढं सांगूनही तो तयार झाला. अगदी एका पायावर तयार झाला. त्यानं त्यातून खूप उत्तम कामं केले आणि सुदैवानं ते पात्रं खूप गाजले. सुरूवातीला मी आणि लक्ष्या त्याला कवट्या महाकाळचा रोल करून दाखवायचो आणि तो त्याचं त्याचं शिकून करायचा परंतु त्याचे नावं तो हयात असताना कुणालाही कळलं नाही. 

कोण होते चंद्रकांत पांड्या? 

चंद्रकांत पांड्या यांनी गुजराती चित्रपटात काम केले होते. त्यांनी 'रामायण' (Ramayan) या मालिकेतही निषाद राज राजाची भुमिका साकारली होती. त्यांचे 21 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले ते 72 वर्षांचे होते. 

आपण धडाकेबाज हा पिक्चर अनेकदा पाहिला असेलच. यात लक्ष्मीकांत बेर्डेंना (Laximikant Berde) एक जादूची बाटली मिळते आणि त्या बाटलीत गंगाराम कैद झालेला असतो. त्यांची या चित्रपटात दूहेरी भुमिका म्हणजे डबल रोल आहे. त्याच्याकडे जादूची रेती असते. या रेतीच्या आधारे गंगाराम लक्ष्याला आणि त्याच्या मित्रांना मदत करतो. त्यांच्या मध्ये येतो तो कवट्या महाकाळ.