'इंटरनेट नसेल तर आईच्या डोळ्यात पाहा' 66 वर्षीय जॅकी श्रॉफ यांनी तरूणांना शिकवला धडा

Jackie Shorff on Internet Viral Video : जॅकी श्रॉफ हे आजही आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते. अशावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका व्हिडीओची. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी तरूणांना चांगला सल्ला दिला आहे. तुम्ही ऐकलात का तो?

गायत्री हसबनीस | Updated: Aug 22, 2023, 03:07 PM IST
'इंटरनेट नसेल तर आईच्या डोळ्यात पाहा' 66 वर्षीय जॅकी श्रॉफ यांनी तरूणांना शिकवला धडा title=
jackie shorff video goes viral on instagram gives advice to youth about internet

Jackie Shorff Video: जॅकी श्रॉफ यांची सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली असते. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण काय आहे? आपण सगळेच सोशल मीडियाला एडिक्ट झालेले आहोत. सोशल मीडिया आणि इंटरनेटशिवाय आपलं काही होईल असंही वाटतं नाही. यावेळी तरूण पिढीला जॅकी श्रॉफ यांनी चांगलाच सल्ला दिल्याचे दिसून येते आहे. यावेळी ते जीमच्या बाहेर स्पॉट झाले. त्यातून ते बाहेर आलेले पाहताच त्यांच्या अवतीभोवती पापाराझींचा गराडा वाढला आणि नेहमीप्रमाणे पापराझी सेलिब्रेटींना विचारतात तसे प्रश्न विचारू लागले होते. त्यावेळी त्यांनी आपला मोबाईल हातात घेऊन तरूणांना इंटरनेटच्या अतिवापरावरून खडेबोल ऐकवले आहे. यावेळी त्यांनी हटके असा लुक केला होता. त्यांनी हाफ स्लिवचा रेड शर्ट घातला होता. सोबतच बेलबॉटम डेनिम घातली होती आणि त्यावर त्यांनी सनग्लासेस घातले होते. 

जॅकी श्रॉफ हे सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ हाही लोकप्रिय अभिनेता आहे. तर क्रिशा श्रॉफ देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. गेल्या काही दिवसांपासून जॅकी श्रॉफ हे चांगलेच बिझी दिसत आहेत. त्यामुळे यावेळी पापाराझींशीही बोलताना ते फारच घाईत दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बॅक टू बॅक फ्लाईट्स घेताना दिसत आहेत. यावेळीही त्यांना एक फ्लाईट पकडायची होती. पापराझींनी त्यांना प्रश्न विचारला की ते बोर झाल्यावर नक्की काय करतात.

हेही वाचा : 'गोपी बहू'चे दोन वाढदिवस कसे? स्वत:च केला खुलासा, रंजक उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल कमाल

यावर त्यांनी उत्तर दिलं की, ''मी स्क्रिप्ट वाचेन, आजूबाजूला असलेल्या लोकांशी बोलेन. जेवेन, गाणं म्हणेन. नाहीतर मोठा श्वास घेऊन झोपून जाईन. त्यानंतर ते म्हणाले की, तुमच्या इंटरनेट नसेल ना झाडं, पानं, फुलं, पक्षी, डोंगर पाहा. आपल्या आईच्या डोळ्यात पाहा. आपलं बालपण कसं होतं हे विसरलात का?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे हे अगदी खरं आहे. आपण सगळेच इंटरनेटच्या मायाजलात अडकलेल्या तरूणाईला त्यांनी यावेळी चांगलाच धडा शिकवला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.