मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली. या दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहूती दिली. या सत्य घटनेवर बेतलेला चित्रपट लवकरच चाहत्यांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. पुलवामा दहशदवादी हल्ल्यावर चित्रपट साकारण्याची तयारी बॉलिवूडमध्ये सुरू आहे. तर या चित्रपटात 'धडक' स्टार अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचा चर्चा रंगत आहे.
या दहशतवादी हल्ल्यावर चित्रपट साकारण्याची जबाबदारी खुद्द दिग्दर्शक अभिषेक कपूरने स्वीकारली आहे. गत वर्षी अभिनेत्री सारा अली खानने अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड मध्ये डेब्यू केले होते आणि 'केदारनाथ' सिनेमाच्या दिग्दर्शनानंतर अभिषेकची पाऊले पुलवामा हल्ल्यावर चित्रपट साकारण्याकडे वळली आहे. अद्याप चित्रपटातील अन्य कलाकारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक अभिषेकने या चित्रपटाबद्दल ईशानला विचारले आहे.
बॉलिवूडमध्ये 'बियॉन्ड द क्लाउड' चित्रपटामध्ये डेब्यू करणाऱ्या ईशान खट्टरच्या नावाची जोरदार चर्चा रंगत आहे. ईशानला या चित्रपटाच्या माध्यमातून अधिक लोकप्रियता मिळू शकते. सध्या या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बेतलेला चित्रपट 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली हेती. त्याचप्रमाणे प्रेक्षक आणि समिक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली होती. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.