जान्हवी कपूर आणि इशान खट्टरचा बोल्ड अंदाज

पाहा हा फोटो 

जान्हवी कपूर आणि इशान खट्टरचा बोल्ड अंदाज title=

 मुंबई : सैराटचा रिमेक धडकमधून जान्हवी कपूर आणि इशान खट्टर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर या जोडीने चाहत्यांच मन जिंकल. यानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र समोर आली आहे. पण आता या दोघांचा अंदाज अतिशय बोल्ड आणि सेक्सी असल्याचं समोर आलं आहे. 

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याने श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशानने जान्हवीच्या मांडीवर डोके ठेवले आहे. या फोटोला लोकांनी प्रचंड पसंती दर्शवली असून आता हा फोटो व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishaan Khatter (@ishaan95) on

या फोटोमध्ये जान्हवीने काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जॅकेट परिधान केले आहे. त्याचबरोबर ईशानने डेनिम शर्ट घातला आहे. जान्हवीच्या मांडीवर ईशानने डोके ठेवलेला अत्यंत मोहक असा तो फोटो काढण्यात आलेला आहे. दोघांचा हा सेक्सी आणि तितकाच रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धडक सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवी बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती बड्या स्टार्ससह स्क्रीन शेअर करणार आहे. जान्हवीकडे एका दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याबाबतही विचारणा झाल्याचे बोललं जात आहे. मात्र याबाबत जान्हवीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.