अरे हे काय... प्रेग्नंट ईशा देओल करते दुसरं लग्न ?

अभिनेत्री सोहा अली खाननंतर आता अभिनेत्री इशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला ईशाच्या बेबी शॉवरचा सोहळा होणार आहे. एखाद्या दाम्पत्य त्याच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील सहभागी होतात. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 04:13 PM IST
अरे हे काय... प्रेग्नंट ईशा देओल करते दुसरं लग्न ? title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सोहा अली खाननंतर आता अभिनेत्री ईशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला ईशाच्या बेबी शॉवरचा सोहळा होणार आहे. एखाद्या दाम्पत्याच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील सहभागी होतात. 

 

Godh bharai fittings with the one n only @neeta_lulla  #IndianOutfit #TraditionalGodhBharai #RaniPink #Red

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

हिंदी चित्रपटामध्ये बेबी शॉवरचा कार्यक्रम अगदी अनोख्या पद्धतीने दाखवण्यात येतो. ईशाचा बेबी शॉवर कशा पद्धतीने करण्यात येईल याची सर्वांना उत्सुकता असतानाच त्यासंबंधीची काही माहिती आता समोर आली आहे. ईशा भरत तख्तानीसोबत पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.
सूत्रांच्या माहितीनुसार २७ ऑगस्टला ईशा आणि भरत पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. सिंधी पद्धतीनुसार ते दोघे पुनर्विवाह करणार आहेत. दोन्ही कुटुंबियांसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण असेल.

ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने ‘मॅटर्निटी फोटोशूट’चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोशूट ग्रीसमध्ये करण्यात आले होते.