मुंबई : रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि बिपासा बसू-करण सिंग ग्रोव्हरचे पालक बनल्यानंतर कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरातही गुडन्यूज आहे अशी चर्चा आहे कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच कतरिना कैफच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या सेटवरून कतरिना कैफचे अनेक फोटो समोर आले आहेत.
हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत. 'फोन भूत'च्या यशानंतर कतरिना कैफ विजय सेतुपतीसोबत तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच, कतरिना कैफ तिचा बेबी बंप फ्लॉंट करतानाचा एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. पण कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का?
'मेरी ख्रिसमस'च्या तयारीत असलेली कतरिना कैफ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ एका वेगळ्या आणि अनोख्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं वृत्त आहे. यामुळेच या फोटोत दिसणारा हा बेबीबंप या सिनेमाचा एक भाग आहे.
कतरिना कैफ या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करत आहे. तिचे चाहते तिच्या 'गुडन्यूज'ची घोषणा करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न झालं होतं. पुढील महिन्यात हे कपल त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीबद्दल यापूर्वीही अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र कतरिना कैफ याबद्दल कधीही काहिच बोलली नाही. मात्र या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं होतं की, कतरिना आणि विकीने जरी अशी योजना आखली असली तरी ते त्यांच्या चाहत्यांमध्ये याची घोषणा नक्कीच करेल. सध्या दोघंही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत