बिपाशा बासूकडे गूड न्यूज?

गेल्या काही दिवसांपासून बिपाशा बासूच्या गरोदरपणाची चर्चा रंगली आहे. पण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 21, 2017, 08:21 PM IST
बिपाशा बासूकडे गूड न्यूज?  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बिपाशा बासूच्या गरोदरपणाची चर्चा रंगली आहे. पण 

नेमकं खरं काय हे मात्र कुणीच सांगत नव्हतं. अखेर बिपाशा बासूने यावर उत्तर देऊन सर्वांना गप्प केलं आहे. बिपाशा बासूने करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यानंतर सारखी चर्चेत आहे. कधी तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या हनीमुनच्या फोटोजमुळे. पण आताचं कारण होतं बिपाशाच्या प्रेग्नेसीचं. 

मात्र, ही चर्चा तिला फार पचनी पडलेली नाही.  वास्तविक काही दिवसांपूर्वी बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर मॅटरनिटी हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, बिपाशा गर्भवती असावी. त्याचबरोबर बिपाशा ही गुड न्यूज चाहत्यांसाठी केव्हा शेअर करणार यावरूनही चर्चा रंगली होती. 

अखेर बिपाशानेच एका मुलाखतीत गर्भवती असल्याच्या चर्चेवर खुलासा करीत, या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले की, सध्यातरी आमचे असा कुठलाच प्लान नाही. त्यामुळे मी गर्भवती असल्याच्या चर्चा निराधार आहेत. यावेळी बिपाशाने माध्यमांना विनंती करताना म्हटले की, कृपया अशाप्रकारच्या बातम्या देणे अन्य कुठलाही अंदाज लावणे बंद करावे. दरम्यान, बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्यासोबत एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल स्टार प्लसच्या ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या रिअ‍ॅलिटी शोच्या जज पॅनलमध्ये सहभागी होणार आहेत. 

बिपाशाचा पती करण तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा ‘दिल मिल गए’ या मालिकेत त्याने डॉक्टर अरमान मलिकची भूमिका साकारली होती, तर बिपाशाने ‘डर सबको लगता हैं’ हा टीव्ही शो होस्ट करून छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. गेल्या काहीकाळापासून बिपाशा एकाही चित्रपटात झळकली नाही. परंतु पती करणसोबत ती नेहमीच व्हेकेशनवर जाताना स्पॉट होत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच चर्चा असते.