आमिरची लेक करतेय फिटनेस कोचला डेट

पुन्हा एकदा इराच्या अफेअरची चर्चा 

Updated: Nov 25, 2020, 03:21 PM IST
आमिरची लेक करतेय फिटनेस कोचला डेट  title=

मुंबई : आमिर खानची मुलगी इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इरा खान आज चर्चेत आली ती तिच्या लव लाइफमुळे. आमिर खानची मुलगी इरा खान पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. चार महिन्यांपासून ती एका व्यक्तीला डेट करत आहे. 

आमिर खानची मुलगी इरा खान वडिलांच्या फिटनेस कोचलाच डेट करत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

आमिरच्या फिटनेस कोचचं नाव आहे नुपूर शिखर. असं म्हटलं जातंय की इराने नुपुरला आपल्या आईशी म्हणजे रीना दत्ताशी देखील भेटवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

इरा खान कायमच चर्चेत असते. कधी तिच्या बिनधास्त स्वभावामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे. इरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

या अगोदर इराचं नाव मिशाल कृपलानीसोबत जोडले गेले. मात्र काही दिवसांनी या दोघांच ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, इरा पुन्हा प्रेमात पडली आहे. यावेळी इराने याबाबत कुणालाच न सांगण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात हे दोघं एकमेकांच्या भरपूर जवळ आले. यावेळी इरा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत आहे.