Ira Khan Nupur shikhare Wedding Video : आमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नूपुर शिखरे (Nupur Shikhare) यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कायम लक्षात राहील अशा या लग्नसोहळ्याचा आमिरच्या सेलब्रिटी मित्रांची आणि कुटुंबीयांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
लग्नसोहळ्यादरम्यान, आमिर आणि त्यांच्या दोन्ही Ex Wife सुद्धा दिसल्या. कोर्ट मॅरेज पद्धतीनं आयरा आणि नुपूर लग्नबंधनात अडकले आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबासमवेत ही जोडी छायाचित्रकारांसमोर आली. यावेळी आमिरसुद्धा खेळीमेळीच्या अंदाजात दिसला.
इथं माध्यमांच्या छायाचित्रकारांसमोर Family Photo साठी पोझ करत असतानाच आमिरच्या एका कृतीनं मात्र सर्वांच्या नजरा वळवल्या आणि काहींनी त्याच्यावर नाराजीही व्यक्त केली. आयरा आणि नुपूरच्या विवाहसोहळ्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साऱ्या दृश्यांमध्ये आमिरचं त्याची एक्स पत्नी किरण रावला किस करणं मात्र अनेकांनाच रुचलं नाही.
किरणसोबतचं वैवाहिक नातं संपल्यानंतर आमिरनं या नात्यातील मैत्री असल्याचं स्पष्ट केलं होतं. इतक्यापर्यंत ठीक, पण आयराच्या लग्नसोहळ्यात या जोडीची केमिस्ट्री पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 'इतकं प्रेम होतं तर घटस्फोट कशाला घ्यायचा?', 'यांना हे सर्व करायला दुसरी जागा नाही का?', 'किती ती नाटकं?' अशा कमेंट करत चाहते आणि नेटकऱ्यांनी परफेक्शनिस्ट आमिरवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली.
कलाजगतामध्ये असणारी नात्यांची समीकरणं अनेकदा डोकं चक्रावून सोडतात. त्यातच आता आमिर आणि किरच्या घटस्फोटित नात्यातील मैत्री आणि या मैत्रीतही असणारी जवळीक या विषयाची भर पडून नव्यानं काही चर्चांना वाव मिळाला आहे. आयराच्या लग्नातच नव्हे, तर त्याआधी म्हणजेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला आमिर किरणसोबतच ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्याही घरी ोपहोचला होता. या भेटीदरम्यानचेही त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.