मुंबई : सगळीकडे आयपीएल ऑक्शनची जोरदार चर्चा असताना
एका वेगळ्या विषयाने जोर धरला आहे. अभिनेत्ता ऋषी कपूर यांनी या प्रश्नाकडे साऱ्यांच लक्ष केंद्रित केलं आहे. आयपीएल लिलावात एकाही महिला क्रिकेटपटूचा समावेश करण्यात न आल्याने ऋषी कपूर यांनी सवाल केला आहे. आयपीएल लिलावात महिला क्रिकेटपटूंची बोली का लागली नाही? असा सवाल ऋषी कपूर यांनी केला आहे.
IPL.Just a thought! Why not female Cricketers in the Auction. No gender biases,have a mix of players from cricketing countries in the playing eleven! Or is it that men play a tougher game?
— Rishi Kapoor (@chintskap) January 28, 2018
ऋषी कपूर यांनी ट्विट करून हा प्रश्न विचारला आहे. 'आयपीएल हा एक विचार आहे. आयपीएलच्या लिलावात महिला क्रिकेटपटू का नाहीत? लैंगिक भेदभाव होता कामा नये. आयपीएलमध्ये खेळाडूंचं मिश्रण असायला हवं. हा अवघड खेळ केवळ पुरुषच खेळू शकतात असं काही आहे का?,' असा सवालही त्यांनी केला आहे.
या ट्विटवरून भरपूर मुद्दे समोर आले आहेत. महिला क्रिकेटर उत्तम कामगिरी करताना त्यांना यातून का वगळ्यात आलं आहे.