कधीही पाहिला नसेल indian idol फेम पवनदीप, अरुणिताचा इतका रोमॅन्टिक अंदाज

रिअॅलिटी शोच्या मंचापासून प्रसिद्धीझोतात आलेली ही जोडी आता जणू काही सेलिब्रिटीच झाली आहे

Updated: Sep 6, 2021, 06:16 PM IST
कधीही पाहिला नसेल indian idol फेम पवनदीप, अरुणिताचा इतका रोमॅन्टिक अंदाज  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : इंडियन आयडॉल (indian idol) फेम जोडी, (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांच्याबाबतची नवीकोरी माहिती, व्हिडीओ आणि त्यांचे फोटो दर दिवसाआड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

रिअॅलिटी शोच्या मंचापासून प्रसिद्धीझोतात आलेली ही जोडी आता जणू काही सेलिब्रिटीच झाली आहे. अशा या जोडीचा एक नवा व्हिडीओ सध्या फॅन्सचं लक्ष वेधत आहे. स्पर्धेच्या मंचावर आपल्या गायनामुळं सर्वांची मनं जिंकणारी ही जोडी, इथं मात्र त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळं काळजाचं पाणी करत आहे. 

पवनदीप आणि अरुणिताच्याच एका फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, या जोडीमध्ये सुरु असणारा डोळ्यांचा खेळ पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. 

कार्यक्रमात नव्यानं सुरु झाली पवनदीप- अरुणिताची केमिस्ट्री 
पवनदीपनं इंडियन आयडॉलच्या 12 पर्वाचं विजेतेपद आपल्या नावे केलं होतं. तर, अरुणिता या शोमध्ये उपविजेती ठरली होती. पण, या शोदरम्यान, या दोघांवरही चाहत्यांनी भरभरुन प्रेम बरसवलं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या केमिस्ट्रीबाबत सातत्यानं कुतूहल व्यक्त केलं जाऊ लागलं. ज्यामुळं पुढे जाऊन त्यांचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होत आहे.