मुंबई : 'इंडियन आयडल 12' ची रनरअप अरुणिता कांजीलालने तिच्या गोड आवाजाने सर्वांना घायाळ केलं आहे. आपल्या मखमली आवाजाने सर्वांची मने जिंकणारी अरुणिता आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे. अरुणिताच्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावले आहे. 'इंडियन आयडल 12' मध्ये पवनदीप राजनसोबत तिची जोडी तुफान चर्चेत होती. दोघांची बाँडिंग लोकांना खूप आवडली.
शो संपल्यानंतरही अरुणिता आणि पवनदीपने अनेक प्रोजेक्ट्स एकत्र केले आहेत. या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही अनेकदा समोर आल्या आहे. मात्र त्या चर्चा फक्त अफवा असल्याचं अखेर समोर आलं. 'आम्ही फक्त आणि फक्त चांगले मित्र आहोत...' असं अरूणिता आणि पवणदीपने सांगितलं.
अरुणिताने वयाच्या चौथ्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. आज आम्ही तुम्हाला अरुणिता कांजीलालच्या खासगी आयुष्या संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. अरुणिता कांजीलालसाठी टीव्ही रिअॅलिटी शो नवीन नाही.
छोट्या पडद्यावर प्रथमच अरुणिताने झी बांगला टीव्ही शो 'सारेगामापा लिटिल चॅम्प्स 2013' मध्ये भाग घेतला आणि जिंकली. शो जिंकल्यानंतर तिला पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी मिळाली. तिने ‘अपरिचित’ सिनेमात गायक कुमार सानू यांच्यासोबत गाणं गायलं.
वयाच्या 10 व्या वर्षी अरूणिताने गायनाचा प्रवास सुरू केला. यानंतर, 2014 मध्ये, तिने झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सारेगामापा लिटिल चॅम्प्स या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. यामध्ये ती टॉप 5 मध्ये स्थान मिळवले. त्यानंतर तिने कधी मागे पाहिलं नाही.
'इंडियन आयडॉल 12' मधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. Arealnews च्या बातमीनुसार, तिच्याकडे एकूण 1-2 कोटींची संपत्ती आहे. अरुणिता एका गाण्यासाठी 1 लाख रुपये आणि लाइव्ह शोसाठी 3 लाख रुपये मानधन घेते. कोलकात्यात अरूणिता एका आलिशान घरात राहते. तिच्याकडे टाटा नॅनो, टाटा नेक्सॉन या गाड्या आहेत.