'विरुष्का'ला परदेशात भेटली एक खास व्यक्ती

जाणून घ्या ती आहे तरी कोण 

Updated: Jan 23, 2019, 03:38 PM IST
'विरुष्का'ला परदेशात भेटली एक खास व्यक्ती title=

न्यूझीलंड : विराट कोहली सध्या संपूर्ण भारतीय क्रिकेट संघासोबत न्यूझालंडमध्ये आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. या दौऱ्यात विराटला क्रीडारसिकांची साथ मिळत आहेच. त्यासोबतच पत्नी अनुष्काचीही साथ त्याला मिळत आहे. 

आगामी चित्रपट, चित्रीकरण या साऱ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत अनुष्काही न्यूझीलंडला पोहोचली आहे. अनुष्का आणि विराट या सेलिब्रिटी जोडीच्या लोकप्रियतेचा प्रत्यय परदेशातही येत आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे विरुष्काच्या अशाच एका चाहतीची.

बऱ्याच फॅन पेज अकाऊंटवरुन विराट, अनुष्काच्या या चिमुरड्या चाहतीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विराट मोठ्या कुतूहलाने तिच्याशी संवाद साधताना दिसत आहे, तर अनुष्का त्याच्याक़डे पाहात आहे. हा फोटो पाहता न्यूझीलंडमध्येही त्यांना चाहत्यांचं अमाप प्रेम मिळत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli Fan Club (@viratkohli.club) on

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाही अनुष्का तिथे हजर होती. आपल्या कामातून वेळ काढत अनुष्का आणि विराट नेहमीच त्यांच्या नात्यासाठी काही खास क्षण देताना दिसतात. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक फोटोही #CoupleGoals या हॅशटॅगअंतर्गत शेअर करण्यात येतात. मुख्य म्हणजे ही जोडीही चाहत्यांना निराश करत नाही. सेल्फी घेणं म्हणू नका किंवा मग चाहत्याच्या एखाद्या कृतीला दाद देणं असो विराट आणि अनुष्का अनोख्या प्रकारे नेहमीच आपल्या हितचिंतकांसोबतचं नातं दृढ करु पाहतात.