'राजा रानीची गं जोडी'मध्ये झळकणार फँड्री मधील 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री?

स्मॉल स्क्रिनवरील ''राजा रानीची गं जोडी' ही मालिका फार कमी वेळात घराघरात पोहोचली. 

Updated: Sep 16, 2021, 08:28 AM IST
'राजा रानीची गं जोडी'मध्ये झळकणार फँड्री मधील 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री? title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील ''राजा रानीची गं जोडी' ही मालिका फार कमी वेळात घराघरात पोहोचली. मालिकेत नवनवीन ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मालिकेत वेगळंच वळण येत असून मोठा बदल करण्यात आल्याचं समजतयं. गेल्या काही भागांमध्ये मोना आपल्याला दिसली नाही. याचे कारण काही दिवसांपूर्वी गुलदस्त्यात होते. पण ते आता समोर आले आहे. 

आधीची मोना म्हणजे श्वेता खरात... श्वेता खरात सध्या 'मन झाला बाजींद'मध्ये प्रमुख भूमिकेचे दिसतेय. त्यामुळे तिने राजा राणी ची गं जोडी ही मालिका सोडली आहे. तर आता नवीन मोना कोण असणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे या मालिकेत आपल्याला नवीन मोनाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याने नागराज मंजुळे यांच्या शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहे. तहकूब या शॉर्ट फिल्म मधेही तिने काम केले आहे.  त्यानंतर तिने फॅन्ड्री, बबन सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ऐश्वर्याने पुणे येथील ललित कला केंद्रात अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता तिच्या या पात्राला आणि तिला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे लवकरच कळेल..