धक्कादायक : Bigg Boss च्या घरात सिंगरकडून स्वत:वर चाकूने वार करण्याचा प्रयत्न

एका टास्कदरम्यान तिच्या मैत्रिणींनी आपला विश्वासघात केल्याचे पाहून अफसाना दुखावली गेली.

Updated: Nov 12, 2021, 02:57 PM IST
धक्कादायक : Bigg Boss च्या घरात सिंगरकडून स्वत:वर चाकूने वार करण्याचा प्रयत्न  title=

मुंबई : बिग बॉसच्या 15 व्या सिजनमध्ये हिंसक वर्तनामुळे गायिका अफसाना खानला घराबाहेर काढण्यात आले आहे. एका टास्कदरम्यान तिच्या मैत्रिणींनी आपला विश्वासघात केल्याचे पाहून अफसाना दुखावली गेली.

याचा राग येऊन तिने घरातील सर्वांचे आयुष्य नरक बनवण्याची धमकी दिली. टास्क संपल्यानंतर ती बाहेर आली आणि तिने राजीव अडातिया यांच्यावर वॉशरूममध्ये अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला.

एवढेच नाही, तर राजीवला घरी तुरुंगात पाठवण्याची धमकीही दिली. राजीव अडातिया यांनी अफसानाला अजिबात हात लावला नाही असे सांगत असताना, नेहा भसीनने अफसानाला सांगितले की तिची आणि राजीवची खरी मैत्री आहे. अफसाना राजीवला सांगत होती की, जर तो तिच्या जवळ कुठेही आला तर ती त्याची प्रतिमा खराब करेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अफसानाने शमिता शेट्टीवर तिचा भाऊ राजीवचा वापर केल्याचा आरोपही केला आहे. अफसानाचा फटकार पाहून तिने शमिताला 'मेंटल' आणि 'फेक' म्हटले आहे. शमिता म्हणते की, अफसाना वेडी झाली आहे आणि तिचा खेळ विसरली आहे.