मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्राला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. विशेषतः टप्पू. सध्या राज हा टप्पूची भूमिका साकारत असला तरी आजही अनेकांच्या मनात जुन्या टप्पूच्या म्हणजेच भव्य गांधींच्या आठवणी ताज्या आहेत. पण आता तो जुना टप्पू मोठा झाला आहे आणि त्याचे नावही एका सुंदर अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिका साकारणारी भव्य गांधी आता मोठा झाला असून गुजराती चित्रपटांकडेही वळला आहे. दरम्यान, त्याची लव्ह लाईफही सध्या चर्चेत येत आहे.
'तारक मेहता'मध्ये सोनूची भूमिका करणाऱ्या निधी भानुशालीसोबत पहिल्यांदाच भव्य गांधीचे नाव जोडले गेले आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची बातमी आली होती पण भव्यने एकदा खुलासा केला होता की ते फक्त चांगले मित्र आहेत. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम लागलं. पण आता भव्यचं नाव एका ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.
निधीनंतर, भव्य गांधीचे नाव दिगंगना सूर्यवंशीशी जोडले जात आहे. दिगंगना टीव्ही मालिका 'वीरा'च्या मध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रिपोर्टनुसार, दोघेही अवॉर्ड नाईटमध्ये भेटले आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिगंगना सूर्यवंशी आणि भव्य अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. हे पाहून दिगांगना आणि भव्य एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येवू लागला. दिगंगनाने 2002 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी ती 7 वर्षांची होती. 'क्या हादसा क्या हकीकत' या मालिकेमध्ये ती दिसली होती, पण 'एक वीर की अरदास वीरा' या टीव्ही मालिकेमधून तिला मोठा ब्रेक मिळाला.