'दीपिकासोबत इंटिमेट...', अभिनेत्याने 'ही' इच्छा व्यक्त केल्यानंतर खळबळ

सध्या त्याचा कुठलाच चित्रपट चर्चेत नाही परंतु सध्या तो त्याच्या बॉल्ड वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 

Updated: Jul 13, 2022, 02:49 PM IST
'दीपिकासोबत इंटिमेट...', अभिनेत्याने 'ही' इच्छा व्यक्त केल्यानंतर खळबळ title=

मुंबईः बॉलीवूडमधून 'मर्डर', 'राज', 'क्रुक'सारख्या चित्रपटातून बॉल्ड सीन देणारा अभिनेता गेली अनेक वर्षे गायब आहे आणि तो अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. त्याच्या चाहत्यांची अशी इच्छा होती की तो लवकरच ओटीटीवर येईल पण इम्रान हा फारश्या वेबशोजमधून ओटीटीवरही आलेला नाही. सध्या त्याचा कुठलाच चित्रपट चर्चेत नाही परंतु सध्या तो त्याच्या बॉल्ड वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 

इम्रान हाश्मीचे संपुर्ण नाव सैय्यद इम्रान अनवर हाश्मी आहे. त्याने 'राज' या आपल्या चित्रपटातून असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे. २००३ साली आलेल्या 'फुटपाथ' या चित्रपटातून इम्रान हाश्मीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचसोबत मल्लिका शेरावतने केलेल्या बॉल्ड सीनमुळे दोघेही चर्चेत आले होते. एका मुलाखतीदरम्यान बोलताना इम्रानने हेही कबूल केले होते की 'मर्डर' चित्रपटातून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत काम केल्यावर इंटिमेट सीन देताना जास्त मजा त्याला आली होती. मल्लिका शेरावतपेक्षा जॅकलिनसह इंटिमेट सीन देताना त्याने एन्जॉय केल्याचे त्याने कबूल केले होते. 

अनेक अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन्स दिल्यानंतर मात्र अजूनही इम्रानची हौस कमी झालेली नाही. मल्लिका शेरावत आणि जॅकलिन फर्नांडिससोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर आता इम्रानला चक्क दिपिकासोबत इंटिमेट सीन करायचा आहे. अशी कबूली त्याने 'कॉफी विथ करन'च्या टॉक शोमध्ये बोलताना दिली होती. त्याचसोबत दिपिका पादूकोनसह आपल्याला किसिंग सीन द्यायला आवडेल असे तो यावेळी म्हणाला होता.  

दीपिका पादूकोनही आपल्या बोल्ड लुकसाठी फेमस आहेच. त्याचसोबत 'रामलीला'पासून ते यावर्षीच प्रदर्शित झालेल्या 'गेहेराईंयां'पर्यंत दीपिकाचेही बोल्ड सीन्स फेमस आहेत. ते दोघं कुठल्या चित्रपटात एकत्र येतील याची काहीच कल्पना कोणाला नाही पण दीपिकासोबत डायरेक्ट इंटिमेट सीन देण्याची इच्छा जाहीरपणे बोलल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सध्या इम्रान आपल्या 'टागयर ३' या चित्रपचटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्यात तो विलिनचे काम करणार आहे. इम्रान आता चित्रपटापेक्षा त्याच्या फिटनेससाठी जास्त फेमस आहे. त्याच्या फिटनेसचे व्हिडिओ सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. लवकरच 'टायगर ३' मधून इम्रान नव्या लुकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.