अभिनेत्री Ileana Dcruz ला ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करणं पडलं महागात, Oops Moment ची शिकार

अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे

Updated: Jan 22, 2022, 07:42 PM IST
अभिनेत्री  Ileana Dcruz ला ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करणं पडलं महागात,  Oops Moment ची शिकार title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे फोटो असे असतात की, ते लोकांचं लक्ष वेधून घेतात. याचं कारण म्हणजे बहुतांश अभिनेत्रींचा ड्रेसिंग सेन्स. अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा बॉडीशेपर स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामुळे अभिनेत्रीचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये इलियाना डिक्रूझने जांभळ्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे. फोटोत, अभिनेत्रीचा ड्रेस समोरच्या बाजूने झाकलेला आहे तर ड्रेस मागील बाजूने बॅकलेस आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये अभिनेत्रीचा बॉडीशेपर मागील बाजूने स्पष्ट दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीची फिगर थोडी विचित्र दिसत आहे. त्यामुळे हे फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये इलियानाने लाल रंगाची गडद लिपस्टिक लावली आहे. यासोबत तिने ड्रेसला मॅचिंग कानातले घातले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉडीशेपर दिसल्याने झाली Oops Moment ची शिकार
या फोटोमध्ये पारदर्शक ड्रेसमुळे अभिनेत्रीOops Momentची शिकार झाली. ज्याचं कारण तिचा बॉडीशेपर बनला आहे. समोर आलेल्या फोटोत, मागच्या बाजूने बॉडीशेपर ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आणि अभिनेत्री Oops Moment ची शिकार झाली.