इलियाना डिक्रूजकडून ते फोटो शेअर, दाखवला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड अवतार

इलियाना डिक्रूझने साउथ सिनेमा ते बॉलिवूड पर्यंतचा आपला यशस्वी प्रवास केला आहे. 

Updated: Sep 23, 2021, 06:55 PM IST
इलियाना डिक्रूजकडून ते फोटो शेअर, दाखवला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड अवतार  title=

मुंबई : इलियाना डिक्रूझ, जिने साउथ सिनेमा ते बॉलिवूड पर्यंतचा आपला सर्वोत्तम प्रवास केला आहे. ती चित्रपटांसोबत तिच्या स्टाईलिश शैलीसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते हतबल आहेत.

अभिनेत्री चाहत्यांशी संवाद साधत असते
इलियाना डिक्रूझ तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया साइटवर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांची मनेही जिंकताना दिसते. चाहतेही अभिनेत्रीच्या नवं-नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

इलियाना बिकिनीमध्ये सनबाथ घेताना दिसली
इलियाना डिक्रूज आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अभिनेत्री बिकिनीमध्ये सनबाथ करताना दिसत आहे. या फोटोमुळे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा घायळ झाले आहेत.

चाहत्यांकडून प्रचंड कौतुक 
हे इलियानाचे थ्रोबॅक फोटो आहेत. फोटोमध्ये इलियाना मेकअपशिवाय दिसत आहे. तिने लटकन घातले आहेत. इलियानाने बिकिनी इमोजी आणि सन इमोजीसोबत तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मला पुन्हा ते सनी दिवस हवेत.' चाहते तिच्या या बोल्ड फोटोंवर कमेंट करून इलियानाचं कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इलियाना या चित्रपटामुळे चर्चेत 
इलियानाने 2012 मध्ये 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यात ती रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रासोबत दिसली होती. इलियाना शेवट अभिषेक बच्चन स्टारर 'द बिग बुल' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच 'अनफेयर अँड लव्हली' मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.