शाहरुख खानच्या मुलासोबत काजोलची लेक न्यासा देवगन गेली पळून?

भलेही काजोल आणि शाहरुख खान या जोड्या रिअल लाईफमध्ये नाहीयेत मात्र रिल लाईफमध्ये ही जोडी सुपरहिट आहे. 

Updated: Jan 9, 2023, 04:56 PM IST
शाहरुख खानच्या मुलासोबत काजोलची लेक न्यासा देवगन गेली पळून?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि शाहरुख खान (Shahrukh khan And Kajol) हे जोडी बॉलिवूडची ऑनस्क्रिन फेवरेट जोडी आहे. या जोडीवर नेहमी प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता या कलाकारांची मुलंही खूप मोठी झाली आहेत. पण जर काजोलची लेक आणि शाहरुखचा मुलाने पळून जाऊन लग्न केलं तर? असाच प्रश्न काजोलला विचारला गेला. ज्याचं उत्तर ऐकून सगळे 

फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच हिट जोड्या बनल्या आहे. भलेही काजोल आणि शाहरुख खान या जोड्या रिअल लाईफमध्ये नाहीयेत मात्र रिल लाईफमध्ये ही जोडी सुपरहिट आहे. याच लिस्टमध्ये सगळ्यात वर नाव आहे रोमान्स किंग म्हटलं जाणारा शाहरुख खान आणि काजोलचं दोघांनी अनेक हिट सिनेमा दिले आहेत. या जोडीला ऑडियंसद्वारे खूप पसंतीही मिळते. या जोडीने बऱ्याच सिनेमात रोमान्सही केला आहे. 

आर्यन आणि न्यासा पळून गेले तर?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोचा आहे. ज्यामध्ये काजोल, शाहरुख आणि राणी मुखर्जी दिसत आहेत. करणने काजोलला विचारलं की, आजपासून 10 वर्षांनंतर जर आर्यन खान आणि न्यासा देवगण पळून गेले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? काजोलने असं उत्तर दिलं की शाहरुखही गोंधळून गेला.

काजोल म्हणली, 'दिलवाले दुल्हा ले जायेंगे'  यावर शाहरुख म्हणतो की मला विनोद समजला नाही. मला भीती वाटते की काजोल माझी नातेवाईक झाली तर... मी कल्पनाही करू शकत नाही. शाहरुखचे हे वक्तव्य ऐकून काजोल आणि राणी मुखर्जी हसू लागतात.

न्यासाचे फोटो होतात व्हायरल
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि काजोलची मुलगी न्यासा हे दोघेही लोकप्रिय स्टार किड्स आहेत. येत्या काही दिवसांपासून या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन खानचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. न्यासा सध्या सोशल मीडियावर सक्रिय नाहीये. पण जेव्हा ती बाहेर येते तेव्हा पापाराझी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात.