मुंबई : शनिवारी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मात्र अमिताभ यांना यकृत आणि इतर आजार असल्यामुळे या काळात त्यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ती काळजी नानावटी रुग्णालयाकडून घेतली जात आहे. याबाबतची माहिती बिग बी यांनी स्वतः एका व्हिडिओत करून दिली आहे. एवढंच नव्हे तर अमिताभ यांनी नानावटी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी तयार केलेल्या व्हिडिओत कोरोना यौद्धांच भरभरून कौतुक केलं आहे. नानावटी रुग्णलायतील कर्मचाऱ्याची ज्या पद्धतीने माझी काळजी घेत आहेत. त्यासाठी मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे असं बिग बी म्हणाले आहेत. २ मिनिटे ३५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. (अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयाकडून माहिती)
मी अमिताभ बच्चन, मला नानावटी रुग्णलयातील सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचाय. या महामारीच्या काळात ते जे काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. काही दिवसांपूर्वीच मी गुजरातमधील सुरतचा एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, या कोरोनाच्या काळात मंदिर का बंद आहेत? माहित आहे का तुम्हाला... तर त्या मंदिरातील सगळे देव सफेद रंगाचा कोट घालून रुग्णालयात रुग्णाची सेवा करत आहेत. (अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती)
या काळात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये ईश्वराचा अंश आहे. तुम्ही सगळे माणसुकीकरता काम करत आहात. तुम्ही सगळे जीवनदायी बनले आहात. मी तुम्हासगळ्यांसमोर मी नतमस्तक आहे असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विरल भयानी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ४४ वर्षीय ज्युनिअर बच्चन म्हणजे अभिषेक बच्चनला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.