'अफवांवर विश्वास ठेवू नका मी जिवंत....' निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

Neena Kulkarni Death Fact Check : सोशल मीडियावर नीना कुलकर्णी यांच्या निधनाची पोस्ट व्हायरल होत आहे. यावर नीना कुलकर्णी यांनी स्वतः पोस्ट करुन आपण जिवंत असल्याचं म्हटलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 28, 2024, 02:34 PM IST
'अफवांवर विश्वास ठेवू नका मी जिवंत....' निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट  title=

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे नीना कुलकर्णी, नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. नीना कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. यावर स्वतः नीना कुलकर्णी यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सध्या नीना कुलकर्णी यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. 

मी जिवंत आहे... 

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी निधनाच्या अफवावर म्हटलं आहे की, देवाच्या कृपेने मी व्यवस्थीत आहे. महत्त्वाचं म्हणजे मी काम करत आहे. त्यामुळे तुम्ही अशा अफवांना पसरवू नका. मी जिवंत आहे. नीना कुलकर्णी यांनी इंस्टाग्रामवर स्टेटसवर ही पोस्ट ठेवली आहे. 

नीना कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नीना कुलकर्णी खूप ऍक्टिव आहेत. अनेकदा ते आपले आणि पक्षाचे फोटो पोस्ट करत असतात. नीना कुलकर्णी यांना श्वान, मांजर आणि पक्ष्यांची आवड आहे. त्या अनेकदा आपल्या या पाळीव प्राण्यांचे फोटो पोस्ट करताना दिसतात.  नीना कुलकर्णी 68 वर्षीय असून त्या अतिशय फीट आहेत.

नीना कुलकर्णी सध्या 'स्टार प्रवाह' वरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करत आहेत. त्यांनी या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. त्यांच्यासोबच पूजा विरारी आणि विशाल निकम देखील प्रमुख भूमिकेत आहेत.