लग्नाच्या पहिल्याच रात्री करिश्मा कपूरच्या पतीने केलं होतं किळसवाणं कृत्य; अभिनेत्रीनेच केला खुलासा

कधी कधी अभिनेत्री जितक्या चेहऱ्यावर खूश दाखवतात तितक्या त्या खऱ्या आयुष्यात खूश कधीच नसतात. त्यांच्या मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज आम्ही तुम्हाला करिश्मा कपूरबद्दल तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

Updated: Jan 18, 2024, 03:26 PM IST
लग्नाच्या पहिल्याच रात्री करिश्मा कपूरच्या पतीने केलं होतं किळसवाणं कृत्य; अभिनेत्रीनेच केला खुलासा title=

मुंबई : आज अभिनेत्री करिश्मा कपूर कोण ओळखत नाही. टॉप अभिनेत्रींच्या यादीत करिश्मा कपूरचं नाव घेतलं जातं. त्या काळात करिश्मा कपूरचं स्टारडम इतकं वाढलं होतं की, प्रत्येक हिरोला करिश्मासोबत काम करायचं होतं. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खूप दुख: सहन केलं आहे. आज आम्ही तुम्हाला करिश्माच्या खऱ्या आयुष्याची कहाणी सांगणार आहोत. 

करिश्मा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यात जितकी उंचीच्या शिखरावर गेली तितकीच ती तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अयशस्वी ठरली. 2003 मध्ये तिने लग्नगाठ बांधली. तिचा विवाह  बिझनेसमन संजय कपूरसोबत झाला. प्रत्येक मुलगी डोळ्यात अनेक स्वप्ने घेऊन सासरच्या घरी येते तशीच करिश्माही अनेक स्वप्न घेवून सासरी आली. मात्र तिला तिचं हे लग्न तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. तिच्या लग्नानंतर तिचं संपुर्ण आयुष्यच बदलून गेलं. लग्न ही करिष्माच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. असं म्हटलं जातं की, तिच्या पतीपासून ते सासरच्या मंडळींपर्यंत सर्वांनीच तिला खूप त्रास दिला.  

अभिनेत्रीने खुलासा केला होता की, लग्नानंतर करिश्मा कपूरचा खूप छळ करण्यात आला. एकदा एका दिलेल्या मुलाखतीमध्ये करिश्माने अनेक रहस्य उघड केली. तिने उघड केलेली रहस्य खरोखरच धक्कादायक होती. या मुलाखती मध्ये तिने उघड केलं की, करिश्माच्या पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला त्याच्या मित्रांसोबत झोपण्यास भाग पाडलं होतं. एवढंच नाही तर करिश्मा कपूरसोबत झोपण्याची किंमतही त्याने त्याच्या मित्रांना सांगितली होती. एवढंच नव्हेतर तिने असं करण्यास नकार दिल्यावर तिच्या पतीने तिला  मारहाण करण्यास सुरुवात केली.

 एवढंच नव्हेतर करिश्मा कपूरने सांगितलं की, प्रेग्नंसी दरम्यान तिला तिच्या सासूने कानशिलात लगावली होती. याचबरोबर संजयने त्याच्या भावाला अभिनेत्रीवर लक्ष ठेवायला सांगितला होता. यानंतर करिश्मा आई झाल्यावरही संजयमध्ये काहीच सुधारणा झाली नाही त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 11 वर्षानंतर करिश्मा कपूरने 2016 मध्ये संजय कपूरला घटस्फोट दिला. मात्र या दोघांचा घटस्फोटही सोपा नव्हता. संजयने करिश्मावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोपही केले होते आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता.