महत्त्वाचे मुद्दे
मुंबई : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन(Hritik roshan ) म्हणे आता एका तरुणीला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच या तरुणीसोबत डिनर डेटवरून रेस्तराँमधून बाहेर पडत्याना त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठलं.
सुझॅनला बऱ्याच वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्यानंतर हृतिच्या आयुष्यात कोणतीही मुलगी आल्याचं पाहायला मिळालं नव्हतं.
पण, त्यानंतर मात्र आता सबा आझाद नावाच्या आर्टिस्ट आणि अभिनेत्री असणाऱ्या 32 वर्षीय तरुणीशी त्याचं नाव जोडलं जात आहे.
एकीकडे बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या अभिनेत्याच्या रिलेशनशिपला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे एक नवा खुलासा झाला आहे.
सध्या हृतिकची प्रेयसी किंवा त्याची खास मैत्रीण म्हणवली जाणारी सबा ही कधी एकेकाळी एका दिग्गज अभिनेत्याच्या मुलालाही डेट करत होती असं म्हटलं जातं.
फक्त डेट नव्हे तर हे दोघं 7 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार सबा ज्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, त्याचं नाव इमाद.
दिग्गज अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचा हा मुलगा. खुद्द इमादनं काही मुलाखतींमध्येही सबा आणि त्याच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे.
2013 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 7 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 2020 मध्ये ही जोडी वेगळी झाली.
आता, 2022 मध्ये सबाचं नाव थेट हृतिकशी जोडलं जात आहे. सबाला हल्लीच्याच एका मुलाखतीमध्ये हृतिकसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. पण, त्यावर ती फार व्यक्त झाली नाही.