दोन मुलांचा वडील असलेल्या हृतिकसोबत ही 'मुलगी' कोण? पाहा व्हिडीओ

करन जोहरच्या पार्टीनंतर मात्र दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होऊ लागली. 

Updated: Jul 24, 2022, 12:51 PM IST
दोन मुलांचा वडील असलेल्या हृतिकसोबत ही 'मुलगी' कोण? पाहा व्हिडीओ title=

Hritik Roshan: सध्या इंडस्ट्रीत चर्चा आहे ती हृतिक रोशन आणि सबा आझादची. करण जोहरच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ते दोघं पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले होते. त्याआधी ते एकदा डीनरच्या निमित्ताने एकत्र आले होते पण तेव्हा त्यांची फारशी काहीच चर्चा नव्हती. ते दोघं एकमेकांना डेट करत असावेत अशी शक्यता होती परंतु त्यावर फारशी चर्चा नव्हती. परंतु करन जोहरच्या पार्टीनंतर मात्र दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होऊ लागली. त्या दोघांना त्यावेळी ट्रोलिंगही केले गेले. 

मध्यंतरी ते दोघं एकत्र लंडनला गेले होते. तिथं त्या दोघांनी एकत्र एका क्लबमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवला होता त्यावेळी ते दोघंही पुन्हा चर्चेत आले होते. त्यांनी आपले हे रोमॅण्टिक क्षण सोशल मीडियावरही शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षावही केला तर काहींनी टीकाही केली. 

ट्रोलिंगच्या बाबतीत हृतिकला आपल्या पहिल्या लग्नावरून, डिव्हॉर्सवरून आणि कंगनासोबतच्या नात्यावरून खूप ट्रोल केले होते. परंतु आता नुकतेच ते एअरपॉर्टवर एकत्र दिसल्याने त्यांच्या ट्रोलिंगला खतपाणी मिळाले, ज्याचे कारणही तसेच होते. सबा आझाद आणि हृतिक रोशन एकमेकांचे हात हातात घेत एअरपॉर्टवरून बाहेर पडले त्यांच्यासोबत हृतिकचा मुलगा, आई आणि बहीणही होते. त्यामुळे अशावेळी हृतिक जेव्हा सबासोबत हातात हात घालून जात होता तेव्हा त्याला, ''तूझ्यासोबत ही तूझी गर्लफ्रेंड आहे की तूझी मुलगी?'' अशी कमेंट करून त्याला चांगलेच ट्रोल केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सबा आझाद ही सुद्धा एक अभिनेत्री आहे परंतु तिने हृतिककसोबत याआधी फारसे काम केलेले नाही. त्यामुळे एकदंरीतच त्यांचा प्रेमारंभ कधी झाला याबद्दल अद्यापही काही कळलेले नाही आहे. हृतिकचा लवकरच दीपिका पादूकोनसोबतचा 'फायटर' हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याचे शुटिंगही परत सुरू होणार आहे.