मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता जरी सिनेमा OTT वर आला असला तरी बॉक्स ऑफिसवर तो अजूनही मजबूत आहे. तो रिलीज होऊन दीड महिना झाला, पण आजही लोकांच्या हृदयात तो ताजा आहे.
पुष्पा हा सिनेमा सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. सामान्यांपासून ते अगदी क्रिकेटर आणि सेलिब्रिटी या सिनेमाच्या प्रेमात आहेत. अनेक क्रिकेटर आणि कलाकारांनी यावर रिल व्हिडिओ शूट केले आहेत.
आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या शुटींगबाबतचे किस्से जाणून घेण्यात उत्सुकता आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुनची दाढीवर हात फिरवण्याची स्टाईल...पुष्पाच्या या स्टाईलची सध्या सगळेच कॉपी करत आहेत. अशाच आता ह्या स्टाईलचा शोध नेमका कसा लागला हे अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनला यामागे नक्की कोण आहे आणि या स्टाईलचा शोध कसा लागला असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता जे म्हणाले ऐकून सगळेच चकीत झाले.
अल्लू अर्जुन म्हणाला, "मी एकदा सेटवर असताना असाच माझ्या दाढीवर हात फिरवत होतो. दाढी नीट करत होतो. तेव्हा ही स्टाईल दिग्दर्शकाने पाहिली. त्याला ती आवडली. मग त्याने फिल्ममध्ये याचा उपयोग करण्यास मला सांगितले. आणि अशा प्रकारे ही पुष्पाची स्टाईल बनली."