मुंबई : सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा होताना दिसते. कोविड काळात त्यानं अनेक लोकांना आणि कलाकारांना मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे जितके कौतुक झाले तितकेच किंवा त्याही पेक्षा जास्त कौतुक हे त्याच्या या समाजकार्याचे झाले.
बॉलीवूडचा देव सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. पायलट होण्याचं एका मुलाचं स्वप्न साकार करून त्याने त्या माणसाचं जीवन कसे बदलून टाकलं ही गोष्ट पाहूया ! एक मुलगा जो एव्हिएशन अकादमीमध्ये पायलट म्हणून ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे आणि हे फक्त सोनू सूदच्या प्रयत्नामुळे शक्य झालं.
गरिबीत जन्मलेल्या या व्यक्तीने अनेक संकटांना तोंड दिलं आणि अशा पार्श्वभूमीतून उदयास आला जिथे पायलट बनण्याची कल्पना अशक्य वाटत होती. याविषयी बोलताना तो म्हणतो " मला खूप संघर्षांचा सामना करावा लागला, जसं की पुरेसं आर्थिक पाठबळ न मिळणं." एअरलाइनमध्ये मदतनीस आणि क्लिनर म्हणून प्रवास सुरू केल्यानंतर, त्याला एक अनपेक्षित सहकारी मिळाला आणि तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. "सोनू सूदने मला मदत केली आणि सोनू सूदच्या प्रेरणेने फाऊंडेशनकडून विनंती केल्यानंतर मला लगेच आर्थिक मदत मिळाली" हा एक माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता.
ज्याने त्याच्या महत्वाकांक्षा पुन्हा जागृत केल्या आणि त्याच्या आकांक्षांना पंख दिले. " माझं स्वप्न सोनू सूदला विमातून उडवण्याचे आहे आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता मी YouTube चॅनेलद्वारे मुलाखत देत आहे, आणि सोनू सूदने स्वतः मला सांगितलं की त्याला माझा अभिमान आहे. ते एक वाक्य माझ्यासाठी आयुष्यभराचं यश आहे. त्याचं प्रोत्साहन केवळ माझंच नाही तर अनेकांचे जीवन बदलून टाकले आहे. माझा YouTube व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोकांना माझ्यासारखे पायलट व्हायचं आहे, असे म्हणत आता अनेकजण माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. हा विश्वास, कमी विशेषाधिकार असलेले देखील पायलट होऊ शकतात. असंख्य लोकांच्या मनात घर केलं आहे, सोनू सूदला धन्यवाद." या पायलटची कहाणी आशेचा किरण आहे. सोनू ने आजवर अनेकांना मदत करून त्यांच्या जीवनात एक नवा बदल घडवून आणला आहे.