'हाऊसफुल्ल' च्या नव्या सिक्वलची घोषणा...

या महिन्यात प्रदर्शित झालेला चित्रपट 'गोलमाल अगेन' चा जलवा बॉक्स ऑफिसवर सुरु आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 27, 2017, 04:32 PM IST
'हाऊसफुल्ल' च्या नव्या सिक्वलची घोषणा...  title=

नवी दिल्ली : या महिन्यात प्रदर्शित झालेला चित्रपट 'गोलमाल अगेन' चा जलवा बॉक्स ऑफिसवर सुरु आहे. त्यातच अजून एका कॉमेडी चित्रपटाची वर्णी लागणार आहे. 'हाऊसफुल्ल' च्या पहिल्या तीन पार्टच्या यशानंतर या सिरीजचा चौथा पार्ट येऊ घातला आहे. 

साजिद नाडीयाडवाला यांची निर्मिती असलेला या चित्रपटाची ऑफिशियल घोषणा ट्विटरवरून करण्यात आली. 

'हाऊसफुल्ल ४' २०१९ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होईल. मीडिया रिपोर्टनुसार साजिद नाडियावाला यांनी अक्षय कुमारच्या मल्टी स्‍टारर चित्रपटाची थीम 'पुनर्जन्‍म' असेल, अशी घोषणा केली. मात्र चित्रपटात कलाकार कोणते असणार हे अद्याप ठरलेले नाही. 'हाऊसफुल्ल' च्या पहिल्या तीन पार्टमधे अक्षय कुमार असल्याने चौथ्या पार्टची कल्पना त्याच्याशिवाय होऊ शकत नाही.